सलमानच्या रेस-3 ने पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी

रेस 3 ची पहिल्याच दिवशी मोठी कमाई

Updated: Jun 15, 2018, 06:46 PM IST
सलमानच्या रेस-3 ने पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी title=

मुंबई : अभिनेता सलमान खानचा 'रेस 3' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे. शुक्रवार सिनेमा रिलीज झाल्यानंतर दर्शकांनी त्याला पसंती दिली. 'रेस-3' चा ट्रेलर आणि गाण्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'टाइगर जिंदा है' नंतर 6 महिन्यांनी सलमान पुन्हा एकदा सिनेमा घेऊन आला आहे. ईदची सुट्टी आणि सलमानचे मोठे प्रमाणात असलेल्या फॅन्समुळे आज सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन यांच्या अंदाजानुसार पहिल्याच दिवशी सलमानच्या या सिनेमाने रेकॉर्ड कमाई केली असेल असं म्हटलं आहे. रेस -3 देशभरात 4300 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी शो हाऊसफूल होता. त्यामुळे सिनेमाने पहिल्या दिवशी 30 ते 35 कोटी कमवल्याची शक्यता आहे. 2018 मध्ये सलमानच्या या सिनेमाला सर्वात मोठी ओपनिंग मिळण्य़ाची शक्यता आहे.