Salman Khan च्या 'टाइगर 3' सेटवरून व्हिडीओ लीक!

Salman Khan च्या 'टाइगर 3' या चित्रपटाची चाहते आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, या सगळ्यात (टायगर 3) च्या सेटवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांची प्रतिक्षा आता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. 

Updated: Feb 28, 2023, 07:05 PM IST
Salman Khan च्या 'टाइगर 3' सेटवरून व्हिडीओ लीक! title=

Salman Khan Tiger 3 BTS Video : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या 'टाइगर 3' (Tiger 3) या आगामी चित्रपटाची त्यांचे चाहते गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. कतरिनाच्या लग्नापासून हा चित्रपट चर्चेत आहे. सलमान खान आणि कतरिनाला एकत्र पाहण्यासाठी त्या दोघांचे चाहते उत्सुक आहेत. त्यांचे चाहते सतत सोशल मीडिया आणि गूगलवर 'टायगर 3' विषयी सर्च करताना दिसतात. अशात 'टायगर 3' च्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

'टाइगर 3' च्या सेटवरील हा व्हिडीओ सलमान खानच्या ट्विटरवरील फेन पेजनं शेअर केला आहे. या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ व्यतिरिक्त इमरान हाश्मी देखील दिसणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक रूम दिसत आहे. या रूममध्ये प्रचंड धूर आहे. तर व्हिडीओमध्ये सगळ्यात आधी इमरान हाश्मी दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता प्रेक्षकांना चित्रपट कधी येणार असा प्रश्न आला आहे. 

दरम्यान, टायगर 3 हा टायगर चित्रपटाची फ्रॅंचायझीतला तिसरा भाग आहे. सगळ्यात आधी एक था टायगर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2017 मध्ये 'टाइगर जिंदा है' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे जेव्हापासून प्रेक्षकांना कळलं की टायगर 3 येणार आहे. तेव्हापासून ते चित्रपटाविषयी काही अपडेट मिळतील का याच्या शोधात होते. आता चित्रपटाच्या सेटवरील म्हणजेच (Behind The Scene) चा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

हेही वाचा : धक्कादायक! मी होते शेतात... तितक्यात त्यानं शूट केला व्हिडीओ; Yami Gautam नं शेअर केला 'तो' अनुभव

या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की मला वाटतं की हा चित्रपट फक्त भारतात बॉक्स ऑफिसवर 1 हजार कोटींचा गल्ला करेल. दुसरा नेटकरी म्हणाला, मी खरं तर इमरान हाश्मीच्या भूमिकेची प्रतिक्षा करत आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, आता इमरान हाश्मीच्या करिअरला भाई वाचवू शकतो. दरम्यान, सलमान खाननं शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात टायगर या भूमिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती