aishwarya rai कपिल शर्मा शोमध्ये का आली नाही, काय आहे salman कनेक्शन?

 'द कपिल शर्मा शो'मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान सांगत आहेत. सलमान खान द कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. त्यामुळे 

Updated: Oct 1, 2022, 06:26 PM IST
aishwarya rai कपिल शर्मा शोमध्ये का आली नाही, काय आहे salman कनेक्शन? title=

aishwarya rai bachchan:  बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या  (aishwaraya rai bachchan ) रायचा 'पोन्नीयिन सेल्वन-1' (Ponniyin Selvan: I) हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, PS-1 तमिळ ते हिंदी पट्ट्यात जोरदार प्रमोशन (promotion) केल गेलं.  याच संदर्भात पोन्नियिन सेल्वन-1  ची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचली. नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा कपिल शर्मा (kapil sharma) शोची संपूर्ण टीम धमाल मस्ती करताना दिसली. त्यांच्यासोबत स्टारकास्टने (Ponniyin Selvan: I)  सुद्धा खूप धमाल केली. मात्र तरीही एक कमी मात्र जाणवत होती आणि ती म्हणजे ,अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची. (salman khan is the reason why aishwaraya rai bachchan not came for kapil sharma show )

आणखी वाचा:  मी तुझ्या BF च्या बाळाची..आईनं मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत..video पाहून संताप

कारण या सिनेमात मिस वर्ल्ड (miss world) ऐश्वर्या राय बच्चन हिची मुख्य भूमिका आहे खरतर सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान (movie promotion) सर्व ठिकाणी ऐश्वर्या दिसत होती मात्र कपिल शर्मा शो मध्ये मात्र ती गैरहजर राहिली . त्यामुळे आता उलट सुलट चर्चा होऊ लागली आहेत.

बॉलिवूड ब्युटी ऐश्वर्या राय बच्चनच्या अनुपस्थितीमुळे चाहते थोडे नाराज दिसत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री शोमध्ये नसताना सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

काही लोक 'द कपिल शर्मा शो'मध्ये ऐश्वर्या रायच्या अनुपस्थितीचे कारण सलमान खान सांगत आहेत. सलमान खान द कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. त्यामुळे कपिल शर्माच्या शोमध्ये न येण्याचा निर्णय अभिनेत्रीने जाणूनबुजून घेतल्याच युजर्सचे मत आहे. तर दुसरीकडे काही युझर्स (users) त्याच्या अगेन्स्ट आहेत

आणखी वाचा:  त्यानं जबरदस्ती माझे..श्रेया बुगडेने पोस्टमध्ये कुशल बद्रिकेबद्दल केला मोठा खुलासा

अभिनेत्रीची बाजू घेणार्‍या नेटिझन्सचे (netizens) म्हणणे आहे की, याआधीही अभिनेत्री 'ए दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी शोमध्ये आली आहे.मात्र, ऐश्वर्या राय द कपिल शर्मा  (the kapil sharma show) शोमध्ये का आली नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कपिल शर्माच्या टीमने

कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच पोनियिन सेल्वन-1 कडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. ऐश्वर्याशिवाय मणिरत्नम आणि एआर रहमान देखील 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचले नाहीत. (salman khan is the reason why aishwaraya rai bachchan not came for kapil sharma show )