सलमान खानचं कुटुंब मोठ्या संकटात, एका पाठोपाठ एक व्यक्ती....

खान कुटुंबावर आलेल्या संकटाचं नेमकं कारण काय?  

Updated: Dec 16, 2021, 11:47 AM IST
सलमान खानचं कुटुंब मोठ्या संकटात, एका पाठोपाठ एक व्यक्ती.... title=

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या कुटुंबातील अडचणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान आधीच कोरोना पॉझिटिव्ह आहे. सीमा खाननंतर आता तिचा 10 वर्षांच्या मुलालाही बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर बीएमसीने खबरदारी घेत सोहेल खानच्या पाली हिल इमारतीचा मजला सील केला आहे.

यापूर्वी, बीएमसीने सोहेल ज्या इमारतीत राहतो ती संपूर्ण इमारत सील केली होती. जिथे सीमा खान आणि त्यांची मुले राहतात. संपूर्ण इमारत सील करण्याच्या बीएमसीच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कारण 5 पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरच संपूर्ण इमारती सील केली जाऊ शकते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नियमांनुसार, फ्लॅटमध्ये दोन किंवा अधिक लोक संक्रमित आढळल्यास ते निवासस्थान सील केले जाईल. 5 लोकांना संसर्ग झाल्यास तो मजला सील केली जाईल आणि इमारतीमध्ये  5 पेक्षा जास्त रहिवाशी कोरोना संक्रमित असल्यास संपूर्ण इमारत सिल केली जाईल. 

करिना कपूर खानसोबत अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात
याआधी करण जोहरच्या घरी डिनर पार्टीत सहभागी झाल्यानंतर करीना कपूर खान, अमृता अरोरा यांना कोरोना विषाणूची लागण झाली. या पार्टीत सीमा खान देखील उपस्थित होती. सीमा खानपासूनच इतर सेलिब्रिटींमध्ये कोरोना पसरल्याचे समोर येत आहे. 

अमृता व्यतिरिक्त करीना, सीमा खान, महीप कपूर आणि मुलगी शनाया कपूर देखील कोविडच्या विळख्यात  सापडल्या आहेत. करण जोहर, आलिया भट्ट, मलायका अरोरा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतू त्यांना 7 होम क्वारंटाईन राहण्यासाठी बीएमसीने सांगितलं आहे.