मुंबई: सैराटनंतर घरापासून ते अगदी सर्वांच्या मनात घर केलेली रिंकू कायमचं चर्चेत आली. कधी आपल्या लूकमुळे तर कधी तिच्या डायलॉकमुळे पण आता शिवजयंतीच्या दिवशी मात्र पुन्हा एकदा रिंकू राजगुरू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण तिचा लूक किंवा डायलॉग नाही तर तिने केलेली जातीय वादाला उत्तर देणारी एक पोस्ट लिहिली आहे.
रिंकूनं इन्टाग्रामवर एक जातीय वादाला उत्तर देणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मराठमोळ्या अंदाजातला रिंकूनं फोटो अपलोड करून त्यावर एक जातीय वादाला उत्तर देणारं कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनमुळे रिंकू चर्चेचा विषय झाली आहे.
रिंकूनं साडी, टिकली, नाकात नथ असा मराठमोठा लूक केलेला या फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो इन्स्टावर अपलोड करत तिने कॅप्शन दिलं आहे. 'छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्त्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्त्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे.' असं रिंकूनं कॅप्शन दिलं आहे.
फोटो आणि या कॅप्शनसह रिंकू राजगुरूनं चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षर: पाऊस पाडला आहे. तर रिंकूंच्या या कॅप्शनवर देखील तुफान चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.
सैराट, कागर, मेकअप यासारख्या चित्रपटातील भूमिकेतून रिंकूनं चाहत्यांची मनं जिंकली. सैराटमधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या रिंकूचा कागर चित्रपटही तितकाच गाजला. याशिवाय रिंकूनं वेबसीरिजमध्ये देखील काम केलं आहे. आता रिंकू पुन्हा एकदा अनपॉज्ड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.