सैराटमधील बाळ्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

नव्या सिनेमांत झळकणार तानाजी 

Updated: Feb 14, 2021, 10:07 AM IST
सैराटमधील बाळ्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज title=

मुंबई : 'सैराट'मधील (Sairat) परश्याचा मित्र बाळ्या याला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला. आता हाच बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. झी टॉकीज प्रस्तुत 'गस्त' या चित्रपटात तानाजी प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

त्याच्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, "मी गस्त या चित्रपटात अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो एका मुलीच्या प्रेमात आहे आणि ज्या गावात राहतोय त्या गावात पहारा देत असताना त्या मुलीला तो चोरून भेटत असतो. त्यांच्या प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी एका गावाकडच्या मुलाची भूमिका निभावतोय आणि प्रेक्षकांना देखील ती नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे."

प्रेक्षकांची लाडकी मराठी चित्रपट वाहिनी - झी टॉकीज ही नेहमीच त्यांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार आणि प्रेक्षकांचे आवडते चित्रपट, मनोरंजक कार्यक्रम, धमाकेदार पुरस्कार सोहळे याचसोबत झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी टॉकीज ओरिजनल चित्रपट देखील सादर केले. गेल्या वर्षी झी टॉकीजने ३ टॉकीज ओरिजनल चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर केली आणि यावर्षी ही वाहिनी 'गस्त' या चित्रपट घेऊन आली आहे.

सैराट नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता तानाजी गालगुंडे चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या भेटीस येणार आहे म्हणून तमाम प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटात अनेक जबरदस्त कलाकारांची फौज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका 'गस्त' २८ फेब्रुवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त झी टॉकीजवर