मराठीतल्या ब्लॉकबस्टर Sairat चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण! पोस्ट शेअर करत आकाश ठोसर म्हणाला...

7 Years of Sairat : सैराट चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच चित्रपटातून आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूला लोकप्रियता मिळाली होती. तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप प्रेम दिलं. तर चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होतं. आजही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 29, 2023, 03:56 PM IST
मराठीतल्या ब्लॉकबस्टर  Sairat चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण! पोस्ट शेअर करत आकाश ठोसर म्हणाला... title=
(Photo Credit : akash thosar Instagram)

7 Years of Sairat : 'सैराट' या चित्रपटानं प्रेक्षकांना भूरळ घातली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यानं अनेक रेकॉर्ड मोडले होते. चित्रपटातील गाणी तर चांगलीच गाजली होती. आज चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली आहेत. चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्षे झाली असली तरी देखील आजही कार्यक्रमांमध्ये चित्रपटातील झिंगाट हे गाणं ऐकायला मिळतं. इतकंच काय तर चित्रपटाची लोकप्रियता पाहता दिग्दर्शक करण जोहरनं त्याचा हिंदी डब चित्रपटही बनवला होता. आज चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसरनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 
 
आकाश आणि रिंकुला याच चित्रपटातून फेम मिळालं आहे. त्याच निमित्तानं आकाश ठोसरनं ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आकाशनं सैराटचं पोस्टर शेअर केलं आहे. यात तो आणि रिंकु दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत सैराटला आज सात वर्षे पूर्ण झाली असं कॅप्शन त्यानं दिलं आहे. त्याच्या पुढे 29 एप्रिल असं आकाश म्हणाला, त्यासोबत आकाशनं #sairat #greatful हे हॅशटॅगही वापरले आहेत. आकाशनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आकाशच्या व्हायरल झालेल्या पोस्टवर नेटकऱ्यां विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'सैराट मूवी सारखा मूवी अजून पण आला नाही सर मार्केटमध्ये आणि यापुढेही येणार नाही असं मला तरी वाटते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अजून हि थिएटरला लावला तर आधीच्या सारखी गर्दी होईल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'किती पण वेळा पाहिला तरी पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो हा चित्रपट...!! चित्रपटाची खूप सुंदर पटकथा आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'खुप वेडा झालतो राव या सिनेमामुळे... हा सिनेमा बघुन आल्यावर दिवसभर सर्वांना स्टोरी सांगितल्यामुळे अक्षरशः झोपेत बडबडत असायचो... लय आवडतो अजुनही सैराट...' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सैराट हा फक्त चित्रपट नाहीये हजारो आठवणी आहेत जुन्या मैत्रीच्या दिवसांची, जुन्या प्रेमाच्या दिवसांची.... अफलातून इतिहास रचला होता आणि आर्ची परश्या यांची तर आवडती जोडी आहे, असा चित्रपट होणे नाही' 

हेही वाचा : सीतेच्या भूमिकेआधी Deepika Chikhlia यांनी 'अशा' चित्रपटांमध्ये केले काम, बी ग्रेड अभिनेत्री म्हणून मिळाली होती ओळख

दरम्यान, आकाशचा घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.