वाढदिवसाच्या निमित्तानं सई ताम्हणकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Sai Tamhankar Good News :  सई ताम्हणकरनं वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी..

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2024, 11:23 AM IST
वाढदिवसाच्या निमित्तानं सई ताम्हणकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!  title=
(Photo Credit : Social Media)

Sai Tamhankar Good News : काही दिवसापासून मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून वेगवेगळ्या शब्दाची पोस्ट शेअर केली होती. यातून नक्कीच ती काहीतरी खास करणार असल्याची झलक प्रेक्षकांना मिळाली होती. तर काल सईनं तिच्या वाढदिवसांच्या निमित्तानं अभिनय क्षेत्रानंतर आता स्वत: चं नशिब एका वेगळ्या फिल्डमध्ये आजमावण्याचं ठरवल्याचं सांगितलं आहे. सई आता फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत एक व्यावसायिका देखील ठरली आहे. 

2024 वर्ष सई साठी अगदीच खास आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि आता व्यवसायता उडी...या मागची गोष्ट काय हे सगळं सई सांगतेय! सईनं स्वतःच्या वाढिवसानिमित्तानं 'मॅडम एस' ( madame S ) हे Merchandise ब्रँड लाँच केलं आहे. अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे आणि त्याची गोष्ट देखील तितकीच भारी आहे. "क्वीन ऑफ स्यासी ट्यूड“ असा याचा अर्थ आहे. या ब्रँड बद्दल सांगताना सई म्हणाली "ब्रँड लाँच करण ही संकल्पना डोक्यात अशी नव्हती पण फॅन्सच्या मनात नुसत रहायच नाही तर उरायचं आहे आणि हे मी या निमित्तानं करू शकते, म्हणून कायम आपल्या फॅन्ससोबत मनापासून जोडले जाऊ आणि या ब्रँडमुळे त्यांचा मनात राहू ही या मागची संकल्पना होती. त्यामुळे हे ब्रँड लाँच केलं. हे फक्त ब्रँड नाही तर माझ्याकडून माझ्या चाहत्यांसाठी प्रेक्षकांसाठी असलेलं हे एक रिटर्न गिफ्ट आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने ते लाँच करणं यासारखा दुसरा मुहूर्त नाही, म्हणून चाहत्यांसाठी असलेलं हे खास रिटर्न गिफ्ट आहे. या Merchandise ला सगळेच खूप प्रेम देतील यात शंका नाही आणि मी उद्योजिका फक्त पेपरवर झाली पण मानसिकरित्या ते काही पटत नाही तुम्ही सगळेच याला भरभरून प्रेम द्याल आणि असच काम करण्यासाठी यातून प्रेरणा द्याल अशी आशा आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ब्रँडच नाव काय असावा हा प्रश्न असताना माझ्या अगदी जवळच्या मित्राने याला छान अस माझ्या पर्सनालीटी शोभेल असं नाव सुचवलं आहे आणि यातून 'मॅडम एस' ( madame S ) हे Merchandise ब्रँड आम्ही लाँच करतोय! क्वीन ऑफ स्यासी ट्यूड सारखा असलेला माझा स्वभाव आणि यातून आलेलं हे कमाल नाव माझ्या Merchandise ला मिळालं आणि हा ब्रँड आजपासून तुमचा झाला असं मी म्हणेल! 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : अर्जुन कपूरच्या प्री-बर्थडे पार्टीत मलायका गैरहजर! नातेवाईकांपासून मित्रमंडळींची मात्र गर्दी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचे 'ग्राउंड झिरो', 'अग्नी'सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता 'मटका किंग' सारखी वेब सीरिज आणि त्यासोबत सई 'डब्बा कार्टेल' या वेब सीरिज आहे. 2024 वर्ष सई साठी आता पुन्हा एकदा खास झालं आहे.