'साहो'च्या मेकर्सकडून ८ मिनिटाच्या सिक्वेलसाठी ७० कोटी

'बाहुबली' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणारा, अभिनेता प्रभास लवकरच एका चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Jul 17, 2019, 08:37 PM IST
'साहो'च्या मेकर्सकडून ८ मिनिटाच्या सिक्वेलसाठी ७० कोटी title=

मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करणारा, अभिनेता प्रभास लवकरच एका चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टार चित्रपट 'साहो'चा काही दिवसापूर्वी टिझर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रभास अॅक्शनच्या अंदाजात प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्याने, सोशल मीडियावर हा चित्रपट जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. 

चित्रपटाच्या 'टिझर'ला बघितल्यावर असे वाटत आहे की, हा चित्रपट अॅक्शन लवर्स चाहत्यांसाठी मेजवानी सारखा ठरणार आहे. एका रिपोर्टनुसार 'साहो' या चित्रपटाच्या ८ मिनिटाच्या सिक्वेलसाठी फिल्‍म मेकर्सला चक्क ७० कोटी मोजावे लागले आहे. या अॅक्शन सिक्वेलचे चित्रिकरण अबू धाबीमध्ये केले गेले आहे. 

या चित्रपटाच्या मेकर्सला असं वाटत आहे की, हा चित्रपट फिल्म जगतात एक इतिहास रचणार, अशी अपेक्षा मेकर्स करत आहे. या चित्रपटात प्रभासची भूमिका फार वेगळी असणार आहे. पण अभिनेत्री श्रद्धा कपूर पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

प्रभास आणि श्रद्धा यांच्या व्यतिरिक्त 'साहो' या चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अरुण विजय, मुरली शर्मा हे, कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत असून हा चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३ भाषेत प्रदर्शित होणार आहे हिंदी, तमिल आणि तेलुगु.