'या' प्रसिद्ध अभिनेत्या मुलगी आहे सागरिका घाटगे

सागरिका घाटगे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे तिच्या लग्नाची खरेदी....

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 11, 2017, 05:50 PM IST
'या' प्रसिद्ध अभिनेत्या मुलगी आहे सागरिका घाटगे  title=

मुंबई : सागरिका घाटगे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे तिच्या लग्नाची खरेदी....

२०१७ सरताना सागरिका आणि झहीर खान विवाहबंधनात अडकणार आहे. पण अद्याप त्यांच्या लग्नाची कोणतीही खरेदी झालेली नाही. त्यामुळे या दोघांबरोबरच यांचे चाहते थोडे काळजीत आले आहेत. एका वेबसाईटला देण्यात आलेल्या  इंटरव्ह्यू मध्ये सागरिका म्हणाली, लग्न ठरले आहे पण अजूनही आमच्या कडून कोणत्याच प्रकारची तयारी झालेली नाही. अजूनही स्थळ ठरलेले नाही, खरेदी झालेली नाही. लग्न म्हटले की वेळ नेहमीच कमी पडतो. 

 सागरिका घाटगे आणि झहीर खान यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल २४ एप्रिल रोजी सोशल मीडियावर घोषणा केली आणि एकच कल्ला झाला. सागरिका घाटगेने 'चक दे गर्ल' म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल. त्यानंतर मराठीमध्ये 'प्रेमाची गोष्ट' या सिनेमामुळे ती चर्चेत आली. सागरिका घाटगेला हा अभिनयाचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला आहे. आता तिचे वडिल हे लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते आहेत. मात्र हे कोण आहेत हे अद्याप प्रेक्षकांना माहित नाही. 

सागरिका ही महाराष्ट्रातील एका राजघराण्यातील असून तिने मराठी, हिंदी, पंजाबी सिनेमांमध्ये कामे केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून झहीर आणि तिच्या नात्याबद्दल अनेक चर्चा होत होत्या. अखेर काल झहीर खान याने ट्विटरवर एक फोटो शेअर करुन ते एंगेज झाल्याचा खुलासा केला. सागरिका घाटगे ही मुळची कोल्हापूरची असून ती प्रसिद्ध अभिनेते विजयेंद्र घाटगे यांची मुलगी आहे. सागरिकाच्या लग्नाच्या चर्चेमुळे इतक्या वर्षात पहिल्यांदाच सागरिकाच्या वडीलांची चर्चा होऊ लागली आहे. विजयेंद्र घाटगे हे सागरिकाच्या वडील आहेत हे अनेकांना यानिमित्ताने पहिल्यांदाच माहिती पडत आहे. ७० च्या दशकात विजयेंद्र घाटगे यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये कामे केली आहेत. त्यांचा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत कारण अनेकांना ते सागरिका वडील आहेत हे माहितीच नव्हते.

विजयेंद्र सिंहराव घाटगे हे इंदौरच्या शाही घराण्याचे वंशज आहेत. इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या सीताराजे घाटगे यांचे विजयेंद्र हे पुत्र. सीताराजे यांचे पती कर्नल एफडी घाटगे कोल्हापूरच्या कसबा कागलमधील शाही कुटुंबाचे सदस्य आहेत. विजयेंद्र घाटगे यांनी १९७६ मधील राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट  'चित्तचोर' मधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'कसमे-वादे', 'प्रेमरोग',  'रजिया सुलतान', 'सत्ते पे सत्ता'  यासारख्या सुमारे ७५ चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यासोबतच 'बुनियाद', 'सिंहासन बत्तीसी', 'तलाश', 'जुनून'  यासारख्या मालिकांमध्येही ते होते.