Kubra Sait Photos: 'समुंदर मे नहाके...' गणेश गायतोंडेच्या 'कुक्कू'ला पाहून तुम्हीही म्हणाल याड लागलं

 'सेक्रेड गेम्स' (Sacred games) ही सीरीज देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरीजपैकी एक मानली जाते. 

Updated: May 16, 2022, 03:52 PM IST
Kubra Sait Photos: 'समुंदर मे नहाके...'  गणेश गायतोंडेच्या 'कुक्कू'ला पाहून तुम्हीही म्हणाल याड लागलं title=

मुंबई : 'सेक्रेड गेम्स' (Sacred games) ही सीरीज देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरीजपैकी एक मानली जाते. या सीरीजमधील प्रत्येक कलाकाराची भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत राहिली. सीरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मैत्रिणीची भूमिका साकारणाऱ्या कुकू उर्फ कुब्रा सैत (Kubra Sait)  हीने ट्रान्सजेंडर बोल्ड अॅक्टरेसची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यातही कुब्रा सैत ही तितकीच बोल्ड आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून चाहते घायाळ झालेत.  
 
कुब्रा सैतने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती समुद्रात एखाद्या जलपरीसारखी दिसतेय. या फोटोला कॅप्शन देताना  कुब्राने (Kubra Sait) स्वत:ला जलपरीही म्हटलेय. कडक उन्हाळ्यात कुब्रा सैतची ही छायाचित्रे ह्रदयाला भिडणारी तसेच चाहत्यांच्या घामाच्या धारा काढणारी आहेत.या फोटोंमध्ये कुब्राने मोनोकिनी घातली असून तिचे केस बांधलेत. अभिनेत्रीची ही आकर्षक स्टाइल चांगलीच व्हायरल होत असून तिचे चाहते तिची जोरदार प्रशंसा करत आहेत.या फोटोवर चाहत्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत असून कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kubbra Sait (@kubbrasait)

ट्रान्सजेंडर पात्राने दिली ओळख 

कुब्रा सैत (Kubra Sait)  हिने अनेक सीरीजमध्ये काम केले आहे. (Sacred games)  'सेक्रेड गेम्स', 'बेकायदेशीर', 'रिजेक्ट्स', 'द वर्डिक्ट - स्टेट विरुद्ध नानावटी', 'अ‍ॅडव्होकेट्स फ्रॉम होम', 'फाऊंडेशन' यासारख्या उत्तम वेब सीरिजमध्ये तिने भूमिका केली आहे. मात्र तिला खरी ओळख 'सेक्रेड गेम्स' मधील कुकू या ट्रान्सजेंडर पात्राने दिली.  अनेक चाहते तिला तिच्या खऱ्या नावापेक्षा 'कुकू' नावानेच ओळखतात. कुब्रा वेब सीरिजपूर्वी अनेक चित्रपटांमध्ये देखील दिसलीय. ज्यामध्ये 'रेडी', 'जोडी ब्रेकर्स', 'जवानी जानेमन', 'गली बॉय' यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.