Sidharth Wedding : चर्चा सिद्धार्थच्या दुसऱ्या लग्नाची; अदिती राव हैदरी होणार नवरी?

Aditi Rao Hydari- Siddharth:  सिद्धार्थ आणि आदितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सिद्धार्थ आणि आदिती लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना सध्या पडला आहे.

Updated: Feb 28, 2023, 10:45 AM IST
Sidharth Wedding : चर्चा सिद्धार्थच्या दुसऱ्या लग्नाची; अदिती राव हैदरी होणार नवरी?  title=
Aditi Rao Hydari and Siddharth groove to viral Tum Tum

Aditi Rao Hydari- Siddharth: बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. त्यातच अभिनेता सिद्धार्थ आणि आदिती (Aditi Rao Hydari- Siddharth) या दोघांच्या नात्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.  या दोघांनी एनेमीच्या एका ट्रेंडिंग लोकप्रिय गाण्यावर नाचतानाचा एक रील पोस्ट केला. त्यानंतर दोघंही चांगलेच चर्चेत आले आहेत. 

आदिती आणि सिद्धार्थ पुन्हा एकत्र दिसले

आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ साऊथ चित्रपटातील 'तुम तुम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आदिती साध्या फ्लॉवर प्रिंटेड शरारा सूटमध्येस सुंदर दिसत आहे, तर सिद्धार्थ कॅज्युअल ब्लॅक शर्ट व ब्लू जिन्स घातली होती. या गाण्याच्या हूक स्टेप करत त्यांनी एकमेकांशी स्टेप्स मॅच केल्या. डान्स मंकीज-द रील डील असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. 

वाचा: सौरव गांगुलींच्या बायोपिकला रणबीरचा नकार, नेमकं कारण काय? 

लग्नाची घोषणा करत आहात का?...  नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

आदिने रिलचा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियारवर दोघेंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  यामध्ये रीलवर कमेंट देताना चाहते म्हणाली  की, रीलमधले दोन्ही माकड आपले फेव्हरेट आहे असे एका युजर्सने म्हटले तर दोन्ही माकड खूप क्युट असल्याचं दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे. तर आदिती आणि सिद्धार्थच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी कमेंट दिली. ‘तुमच्या लग्नाची वाट पाहतोय, लवकर घोषणा करा,’ अशा कमेंट्सही त्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे. 

'रंग दे बसंती' (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. तर अदिती ही लवकरच 'हीरामंडी' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या या वेब सीरिजमधील लूक काही दिवसांपूर्वी रिव्हिल करण्यात आला.