वर्णभेदावरून रेमो डिसूझाला आला वाईट अनुभव

आतापर्यंत अनेकांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे.  

Updated: Feb 8, 2021, 04:25 PM IST
वर्णभेदावरून रेमो डिसूझाला आला वाईट अनुभव title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर अत्यंत मेहनत आणि अनेक संकटांचा सामन करावा लागतो. कलासृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर यशाचं उच्च शिखर गाठलं आहे. अशाचं कलाकारांपैकी एक म्हणजे कोरियोग्राफर रेमो डिसूझा (Remo D'Souza). रेमो आज कोरियोग्राफरसोबतच एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्याने स्वतःचं आजचं स्थान उभं करण्यासाठी फार मेहनत घेतली आहे. 

मात्र करियरच्या प्रवासात त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. रेमोला त्याच्या वर्णभेदावरून अनेकदा खूप काही ऐकावं लागलं. याबद्दल खुद्द रेमोने खुलासा केला आहे. लहानपणी रेमोच्या वर्णभेदावरून त्याला लोकं चिडवायची. फार कमी वयात त्याला रेसिज्मचा सामना करावा लागला होता. 

सुरूवातीला त्याने चिडवणाऱ्या लोकांवर दुर्लक्ष केलं. पण तेव्हा मला या सर्व गोष्टींवर आवाज उठवायला हवा होता. असं देखील तो म्हणाला. परदेशात देखील त्याला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. पण आज रेमो त्याच्या वर्णभेदावरून नाही तर त्याच्या कामगरीमुळे ओळखला जोतो. 

रेमो म्हणाला, 'फक्त छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये नाही तर संपूर्ण जगात वर्णभेद हे कटू सत्य आहे आणि सत्याचा आपण स्वीकार केला पाहीजे. मी लहान असताना देखील अनेक वेळा वर्णभेदावरून लक्ष्य करण्यात आलं. पण मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामाला लक्ष्य केलं.'

सांगायचं झालं तर गेल्या वर्षी रेमोला ह्रदयविकाराचा झटका आला होता. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे. 1995 साली 'बॉलीवूड ड्रीम्स' (Bollywood Dreams) चित्रपटाच्या माध्यमातून कोरियोग्राफर म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. 

त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 'चमेली', 'धूम', '36 चायना टाऊन', 'दिल्ली हाईट्स' या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला. रेमोचा कोरियोग्राफर ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे.