'पद्मावत' सिनेमा या '5' कारणांसाठी पहायलाच हवा !

संजय लीला भंसाळींचा बहूचर्चित  आणि बहूप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावत' हा सिनेमा अखेर सारे अडथळे पार करत 25 जानेवारीला रीलिजसाठी सज्ज झाला आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 24, 2018, 08:10 AM IST
'पद्मावत' सिनेमा या '5' कारणांसाठी पहायलाच हवा !   title=

मुंबई : संजय लीला भंसाळींचा बहूचर्चित  आणि बहूप्रतिक्षित सिनेमा 'पद्मावत' हा सिनेमा अखेर सारे अडथळे पार करत 25 जानेवारीला रीलिजसाठी सज्ज झाला आहे. 

दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट संजय लीला भंसाळींचा आत्तापर्यंतच्या उत्तम कलाकृतींपैकी एक आहे. 

कलाप्रेमी संजय लीला भंसाळींच्या या चित्रपटाला या '5' कारणांसाठी पहायलाच हवे. 

पद्मावतची 5 खास वैशिष्ट्य  

चित्रपटाचे डायलॉग  

'पद्मावत'चा रॉयल अंदाज जसा डोळ्याचं पारणं फेडतो तसेच या चित्रपटातील डायलॉग्सही अंगावर शहारे आणतात. दीपिका, शाहीद आणि रणवीर या  तिघांचेही डायलॉग्स दमदार आहेत. 
दीपिकाचा 'राजपूती कंगन में उतनी ही ताकत है जितनी राजपूती तलवार में...' तर शाहीदचा 'चिंता को तलवार की नोक पे रखे, वो राजपूत...रेत की नाव लेकर समुंदर से शर्त लगाए, वो राजपूत...और जिसका सर कटे फिर भी धड़ दुश्मन से लड़ता रहे, वो राजपूत.' हा डायलॉगही फारच दमदार आहे.  

'खिल्जी'ची भूमिका  

रणवीर सिंहने साकारलेलल्या 'खिल्जी' वर प्रेक्षकांच्या नजरा खिळून राहतात. रणवीरने नुकत्याच त्याच्या एका ट्विटर पोस्टमध्ये खिल्जीची विविध रूपं दाखवताना 'मॉन्स्टर' असा उल्लेख केला आहे. चित्रपटाची सुरूवात 'खिल्जी' म्हणजे रणवीरने होते. खिल्जीसाठी रणवीरने घेतलेली मेहनत वाखाण्याजोगी आहे.  

चित्रपटाचे सेट आणि लोकेशन  

संजय लीला भंसाळींचा चित्रपट म्हणजे भव्य सेट्स हे समीकरण आपसुकच येते.त्यांनी सेट्सवर घेतलेल्या मेहनतीमुळे या चित्रपटाला वेगळाच 'रॉयल' अंदाज आणि भव्य दिव्य रूप आले आहे. चित्रपटातील लोकेशन्सदेखील सेट्सच्या तोडीस तोड आहेत.  

3 डी इफेक्ट्स 

चित्रपटातील 3D इफेक्ट्सदेखील या चित्रपटाची जादू वाढवण्यास मदत करतात. युद्धाच्या दरम्यान बाण चालवणं, आगीचे गोळे फेकणं या सार्‍या गोष्टी 3D मध्ये पाहणं ही  रसिकांसाठी खास ट्रीट आहे. 

चित्रपटाचा शेवटचा अर्धातास 

चित्रपटाचा क्लायमॅक्स फारच सुंदर आहे. शेवटच्या 30 मिनिटांतील सिन्स दमदार आहेत. राजा रतन सिंह आणि खिल्जी यांच्यातील लढत ही खास आहे. रणवीर आणि शाहीद दरम्यान रंगणारी 10 मिनिटांची तलवारबाजी प्रेक्षकांना खिळवून ठेवते.