मुंबई : सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर.
अनुष्का शंकर देखील लोकप्रिय सितारवादक आहे. यांचा नवरा जो राइट यांनी आपला मार्ग वेगळा स्विकारला आहे. दोघांची ओळख 2009 मध्ये विलियम डलरिम्पल दिल्लीतील एका डिनर पार्टीमध्ये झाली होती. यानंतर या दोघांच्या नात्यांची ओळख भारत आणि परदेशात देखील होऊ लागली.
जो राइट हे लोकप्रिय दिग्दर्शक असून प्राइड अॅण्ड प्रेज्युडाइस, अटॉन्मेंट सारखे सिनेमे केले आहेत. जे आपला सिनेमा इंडियन समरसाठी भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी अनुष्काची ऑडिशन घेतलं होतं आणि इंदिरा गांधीचा रोल ऑफर केला होता.
अनुष्काचा जन्म लंडनमध्ये झाला, मात्र तिचं बालपण अमेरिका, यूके आणि भारतात गेलं. अनुष्का शंकरला सहा वेळा ग्रॅमी पुरस्कारांचं नामांकन मिळालं आहे. जो राईट यांनी 'प्राईड अँड प्रेज्युडाईस', 'इंडियन समर' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 2008 मध्ये जो राईटची एंगेजमेंट हॉलिवूड अभिनेत्री रोझमंड पिकेशी झाली होती, मात्र काही महिन्यातच दोघं वेगळे झाले.
अनुष्का-जो जगभरात वेगवेगळ्या कॉन्सर्टच्या निमित्ताने भेटत राहिले होते. तीन महिन्यांनी दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. 26 सप्टेंबर 2010 रोजी लंडनमध्ये एका खाजगी सोहळ्यात दोघं विवाहबंधनात अडकले. त्यांना जुबिन आणि मोहन ही दोन मुलं आहेत.