रवीना टंडनची झेरॉक्स कॉपीच, मुलीचा फोटो पाहून नेटकरी म्हणतायत

Raveena Tandon :  रवीना टंडनने (Raveena Tandon)  तिच्या करिअरच्या उंचीवर असताना लग्न केले होते. या लग्नापासून तिला दोन सुंदर मुल आहेत. ती दररोज तिच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. 

Updated: Dec 4, 2022, 11:35 PM IST
रवीना टंडनची झेरॉक्स कॉपीच, मुलीचा फोटो पाहून नेटकरी म्हणतायत title=

Raveena Tandon :  बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सध्या चित्रपटापासून दुर असली तरी तिचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते खुप आतूर असतात. रवीना टंडन (Raveena Tandon)  सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते, सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिने एक मुलीसोबतचा फोटो टाकला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

फोटोत काय? 

रवीना टंडनने (Raveena Tandon)  तिच्या करिअरच्या उंचीवर असताना लग्न केले होते. या लग्नापासून तिला दोन सुंदर मुल आहेत. ती दररोज तिच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते. रवीना टंडनच्या (Raveena Tandon) मुलीचे नाव राशा टंडन (Rasha thadani) आणि मुलाचे नाव रणबीर थडानी आहे. तिची मुलगी राशा मोठी झाली असून ती खूप सुंदर दिसते. नुकताच रवीना आणि तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटो पाहून बहुतेक लोक राशाची तुलना तिची आई रवीना टंडनशी करत आहेत. ते म्हणतात की राशा अगदी तिच्या आईसारखी दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया?

या व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे की, 'रवीनाची टू कॉपी'. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, 'बॉलिवुडमध्ये बिग बँग होणे बाकी आहे'. एकूणच, राशा आणि रवीनाच्या या नवीनतम व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

तसेच राशा (Rasha thadani) सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. राशाचा सोशल मीडियावर एक चाहता वर्ग आहे. या चाहत्यांना आशा आहे की एक दिवस ती देखील इतर स्टारकिड्सप्रमाणे चित्रपटांमध्ये पदार्पण करेल.