Ratna Pathak on Naseeruddin Shah's Family : लोकप्रिय अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे 1982 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर रत्ना यांनी त्यांच्या लग्नावर त्यांच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती यावर वक्तव्य केलं आहे. त्यांचं कुटुंब या लग्नासाठी तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे नसीरुद्दीन यांच्या कुटुंबानं त्यांचा लगेच स्वीकार केला होता. तर त्यांच्या हॅपी मॅरिड लाइफचं सिक्रेट देखील त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या गोष्टी रत्ना पाठक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
रत्ना पाठक यांनी ही मुलाखत Hauterrfly ला दिली आहे. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाचा नसीरुद्दीन शाह यांच्यासोबतच्या तुमच्या लग्नाच्या निर्णयाला विरोध होता का? त्यावर उत्तर देत रत्ना पाठक म्हणाल्या की "माझे वडील पूर्णपणे आनंदी नव्हते. पण दुर्दैवानं आमच्या लग्नाच्या आधी त्यांचे निधन झाले. आई आणि नसीरमधलं नातं जास्त खराब होतं, पण त्यांनी देखील तडजोड करुन घेतली आणि अखेर त्यांची मैत्री झाली."
रत्ना पाठक पुढे म्हणाल्या की आश्चर्य या गोष्टीचं आहे की "नसीरच्या कुटुंबाचा यासाठी विरोध नव्हता. एकदापण कोणी 'सी' शब्दाचा उच्चार केला नाही, कन्वर्ट. माझ्याविषयी कोणी काही बोललं नाही. मी जशी आहे तसं त्यांनी मला स्वीकारलं. मी खूप नशीबवान आहे, कारण मी अशा लोकांविषयी ऐकलंय, ज्यांना लग्नानंतर सेटल होण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यानंतर माझी त्या सगळ्यांशी मैत्री झाली, ज्यात माझी सासू देखील एक आहे. ती अतिशय घरगुती स्वभावाची होती, परंतु प्रत्येक परिस्थितीत माझ्या विचारांना प्राधान्य द्यायच्या."
पुढे हॅपी मॅरिड लाइफमागचं रहस्य सांगत रत्ना पाठक म्हणाल्या, "फक्त एकमेकांच्या गोष्टी ऐकायच्या. खरंतर एकमेकांशी बोला. मी त्यांचा आणि त्यांच्या संघर्षाला माझ्या स्ट्रगलपेत्रा खूप जास्त सन्मान देते. कारण मला हे अगदी सहजपणे मिळालं आहे. नसीरनं खूप ट्रेडिशनल बॅकग्राऊंडमधून येतात."
त्या पुढे म्हणाल्या की "नसीरनं आमच्या नात्याच्या सुरुवातीलाच सांगितला होता की हा एक चांगला विचार आहे की कोणत्या नात्यावर कधी पती, पत्नी, लव्हर, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडचा लेबल लावला नाही. जर तुम्ही स्वत: ला तुमच्या एक माणूस म्हणून त्या पातळीवर ठेवू शकत असाल आणि बोलू शकत असाल तर लेबल का लावायची? हे मदत करते आणि सुदैवानं आम्ही आमच्या मुलांसोबत असे करू शकलो."