'ग्रॅमी नॉमिनेटेड' अमेरिकन रॅपरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

निप्सी बाईक खरेदीसाठी ब्रोवार्ड काऊंटीमध्ये गेला असताना त्याची हत्या करण्यात आली

Updated: Apr 1, 2019, 01:34 PM IST
'ग्रॅमी नॉमिनेटेड' अमेरिकन रॅपरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या title=

नवी दिल्ली : ग्रॅमी नॉमिनेटेड रॅपर निप्सी हसल याची रविवारी त्याच्या कपड्यांच्या स्टोअरसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनं यूएस मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. गायिका रेहाना, ड्रेक आणि इतर अनेक अमेरिकन सेलिब्रिटींनी या घटनेबद्दल शोक आणि राग व्यक्त केलाय. एवढी मोठी घटना कशी घडली आणि का घडली? याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता त्यांना लागलीय. निप्सी हा केवळ ३३ वर्षांचा होता.

यूएस पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निप्सी बाईक खरेदीसाठी ब्रोवार्ड काऊंटीमध्ये गेला असताना त्याची हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपरवर मारेकऱ्यांनी अनेक गोळा झाडल्या. निप्सीला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, एव्हाना वेळ कधीच निघून गेली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर, याचा काय अर्थ? माझा आत्मा हादरलाय. निप्सीच्या आत्म्याला शांती मिळो... निप्सी तू खूप चांगला माणूस होतास, असं ट्विट गायिका रेहाना हिनं केलंय.

उल्लेखनीय म्हणजे, मजबूत शत्रू असणं हा देखील एक आशीर्वाद आहे, असं ट्विट निप्सीनं मृत्यूपूर्वी काही तास अगोदर केलं होतं. अनेक संघर्षानंतर निप्सीला हे यश मिळालं होतं. निप्सीच्या 'विक्ट्री लॅप'ला सर्वश्रेष्ठ रॅप अल्बम म्हणून नामांकन मिळालं होतं.