कपिल देवच्या भूमिकेसाठी रणवीरने अशी केली तयारी

स्वतः रणवीरने शेअर केली ही गोष्ट 

कपिल देवच्या भूमिकेसाठी रणवीरने अशी केली तयारी  title=

मुंबई : 2018 मध्ये सगळ्या स्टार्सना मागे टाकत रणवीर सिंह हा अभिनेता यंदा अव्वल ठरला आहे. आपल्या जबरदस्त एनर्जी आणि अभिनयामुळे रणवीर सिंहने सगळ्यांचीच मन जिंकली आहे. तसेच रणवीरचा सिंबा हा सिनेमा 28 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

या सिनेमाला घेऊन रणवीर खूप एक्साइट असताना त्याचा आनंद आणखी वाढणार आहे. रणवीर सिंहचा आगामी सिनेमा '83'बाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. या सिनेमात रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 

कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. रणवीर कपिल देवच्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. या भूमिकेसाठी रणवीरने खूप तयारी केली आहे. 

रणवीरच्या खांद्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे. जानेवारीपासून या सिनेमाच्या तयारीकरता रणवीर व्यस्त असणार आहे. 

या सिनेमाच्या तयारीकरता रणवीरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी चर्चा केली. तेव्हा सचिन तेंडुलकर यांनी कपिल देव यांची बॉलिंग ही अतिशय वेगळी होती असं सांगितलं. कपिल देव यांना साकारणं एक वेळेस सोपं होईल पण त्यांच्यासारखी बॉलिंग करणं मात्र थोडं कठीण आहे. 

मिळालेल्या रिपोर्टनुसार रणवीर सिंह स्वतः कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचं ट्रेनिंग घेणार आहे. कपिल देव यांना लोक आदर्श मानतात त्यामुळे त्यांच कॅरेक्टर प्ले करणं आणि त्या भूमिकेला न्याय देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.

रणवीर सिंह या बायोपिकमध्ये कपिल देव यांचा ट्रेडमार्क शॉट म्हणजे आऊटस्विंगर करताना दिसणार आहे. तसेच या सिनेमात तो महत्वाचा भाग देखील दाखवला जाणार आहे जेव्हा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली संघाने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.