Ranveer Singh : विना इंश्योरेंस रणवीर सिंग फिरतोय 4 कोटींच्या कारमधून..

Ranveer Singh Controversy: रणवीर सिंग यांच्या चाहत्यासाठी वाईट बातमी आहे. कारण रणवीर सिंगची एका प्रकरणात मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. रणवीर सिंग मोठ्या वादात अडकला आहे.   

Updated: Oct 19, 2022, 11:28 AM IST

अभिनेता Ranveer Singh च्या अडचणीत वाढ, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Ranveer Singh Car Insurance : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh ) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनच्या (Deepika Padukone) नवरा याचा अडचणीत वाढ झाली आहे. रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे. तो त्याचा अंतरंगी फॅशनने चाहत्यांचं मने जिंकतो. पण रणवीर सिंग यांच्या चाहत्यासाठी वाईट बातमी आहे. कारण रणवीर सिंगची एका प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) चौकशी करणार आहेत. रणवीर सिंग मोठ्या वादात अडकला आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण? 

रणवीर सिंगकडे असलेल्या त्याचा आलिशान कारमुळे (car) तो अडचणीत सापडला आहे. झालं असं की, रणवीरची  Aston Martin Rapide S जिचा मुळ रंग पांढरा, ज्याला इलेक्ट्रिक ब्लू रंग देण्यात आला आहे. रणवीर मुंबई विमानतळाबाहेर (Mumbai Airport) या कारमध्ये बसलेला दिसला. जेव्हा ही कार घेऊन तो रस्त्याने निघाला सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

कार आणि कारवाईचा काय संबंध?

तर या कारचा विमा (Insurance) संपल्यानंतरही रणवीर ती रस्त्यावर चालवताना दिसला. सोशल मीडियावर (Social media) एका युजरने ट्विटद्वारे मुंबई पोलिसांना याची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांना टॅग (tag) केलं. सोशल मीडियावर व्हायरल होत (Viral) असलेल्या फोटोनुसार, रणवीरच्या लायसन्स प्लेटवर 28 जून 2020 ही तारीख आहे. मात्र, अभिनेत्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Ranveer Singh Car Insurance Controversy nmp)

पोलीस काय म्हणाले - 

मुंबई पोलिसांनीही युजरच्या ट्विटवर लगेच प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, 'आम्ही वाहतूक पोलिसांना कळवले आहे.' आता या ट्विटनंतर लोक सोशल मीडियावर रणवीर सिंगला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका यूजरने राग काढत लिहिले- 'एवढ्या सुविधा फक्त व्हीव्हीआयपी लोकांनाच का दिल्या जातात?'

Ranveer Singh : विना इंश्योरेंस रणवीर सिंग फिरतोय  4 कोटींच्या कारमधून..

'या' कार पण आहेत रणवीरकडे 

रणवीर सिंगने ही कार 3 वर्षांपूर्वी खरेदी केली होती आणि तिचा विमा जून 2020 मध्ये संपला होता. रणवीरच्या या कारची किंमत 3.9 कोटी आहे. रणवीर सिंगकडे Lamborghini Urus, Mercedes-Benz GLS, Jaguar XJ L Audi Q5 आणि Land Rover, Range Rover Vogue सारखी इतर अनेक लक्झरी कार आहेत. नुकताच तो लॅम्बोर्गिनी उरुस पर्ल चालवताना दिसला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

रणवीर सिंगचे आगामी चित्रपट

रणवीर, जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्यासोबत पीरियड कॉमेडी चित्रपट 'सर्कस' (circus) मध्ये दिसणार आहे . रोहित शेट्टी दिग्दर्शित , हा चित्रपट 2022 च्या ख्रिसमसला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. सर्कस हे शेक्सपियरच्या 'द कॉमेडी ऑफ एरर्स' नाटकाचे रूपांतर असल्याचं म्हटलं जातं.