चाहत्यांसोबत बेताल वर्तन केल्यानंतर रानू मंडलचा आणखी एक Attitude व्हिडिओ

रानू मंडलचा आणखी एक व्हि़डिओ व्हायरल 

Updated: Nov 9, 2019, 01:26 PM IST
चाहत्यांसोबत बेताल वर्तन केल्यानंतर रानू मंडलचा आणखी एक Attitude व्हिडिओ  title=

मुंबई : रेल्वे स्टेशनवर गाण गाऊन उदरनिर्वाह करणारी रानू मंडल एकाच रात्री लोकप्रिय झाली. सोशल मीडियावर स्टार बनलेल्या रानू मंडलचे दिवसेंदिवस अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओंमधून रानू मंडलचा वेगळाच Attitude पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी रानू मंडल चाहत्यांसोबत बेताल वर्तन करताना असताना दिसली. आता ती मीडियाला वेगळाच ऍटिट्यूड दाखवत आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. मीडिया रानू मंडलला काही प्रश्न विचारत आहेत. तेव्हा रानू मंडल काही तरी खाताना दिसतेय. एवढंच नाही तर ती मीडियाकडे दुर्लक्ष करताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिचं बोलणं हे एक प्रकारचा ऍटिट्यूड दाखवण्यासारखं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kya se kya hogaye dekhte dekhte #ranumondal

A post shared by Our Vadodara (@clickers_of_vadodara) on

पत्रकार रानू मंडलला कौतुक करणारे प्रश्न विचारतात. स्वप्न पूर्ण होतात. तुम्ही आता यशाच्या शिखरावर आहात... असं विचारत असताना रानू मंडल आपल्या बॅगेतून काही तरी खाताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर इकडे तिकडे बघून ती 'मला काही ऐकू येत नाही' असं म्हणतं दुर्लक्ष करते. यानंतर तो रिपोर्टर पुन्हा तोच प्रश्न विचारतो. यामध्ये रानू मंडलचा स्वभाव दिसत आहे. 

या अगोदर देखील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रानू मंडलने तिच्या चाहत्यांना असं काही की ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. ज्या चाहत्यांनी दिला डोक्यावर उचलून धरलं त्याच चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. रानू मंडल देखील इतर सेलिब्रिटींप्रमाणे वागतेय? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. एरवी अगदी सरळ, शांत दिसणारी रानू मंडल या व्हिडिओत भडकलेली दिसत आहे. सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहतीवर रानू मंडल भडकली आहे. रानू मंडलने फिमेल फॅनला अशी वागणूक दिल्यामुळे चाहते भडकले आहेत.