रानू मंडल यांनी उदित नारायण यांच्यासोबत छेडले सूर

ऐका हे गाणं 

Updated: Sep 29, 2019, 10:26 AM IST
रानू मंडल यांनी उदित नारायण यांच्यासोबत छेडले सूर  title=

मुंबई : इंटरनेटवर अगदी काही वेळात लोकप्रिय ठरलेल्या रानू मंडल यांनी आपल्या आवाजामुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांनी 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रानू मंडल यांच्याकडून गाऊन घेतलं. रानूचं हे गाणं सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. या गाण्यानंतर रानू मंडल यांनी बॉलिवूडचे लोकप्रिय गायक उदित नारायण यांच्यासोबत 'कह रही है नजदीकिया' हे गाणं गायलं आहे. हे गाणं हिमेश यांच्यात स्टुडिओत रेकॉर्ड झाला आहे. 

हिमेश यांनी शेअर केला व्हिडिओ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My creative instinct said that for this Classic Romantic track Keh Rahi Hai Nazdeekiyaan from my forthcoming film Happy Hardy and Heer, I should collaborate with the most talented, unique and unconventional talents of the industry. Legendary, Divine and Majestic - featuring Udit Narayan, Ranu Mondal, Paayal Dev and Himesh Reshammiya. Expect the unexpected on this most auspicious day for the Indian Music Industry, Our Dearest Lata Ji’s Birthday. Lots of Love and Thanks again for all your support.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

या गाण्याचा टीझर हिमेश यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे गाणं फक्त रानू मंडल आणि उदीत नारायण यांनीच नाही तर हिमेश रेशमिया आणि पायल देव यांनी देखील गायलं आहे. हे गाणं इतकं सुंदर आहे की त्याचे बोल प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. रानू मंडलचं नशिब इतकं चांगलं आहे की, रेल्वे स्टेशनवरून त्या आता इथपर्यंत पोहोचल्या आहेत. पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यात राहणाऱ्या 55 वर्षांच्या रानू मारिया मंडल अगदी काही काळातच लोकप्रिय झाल्या आहेत. (हे पण वाचा - रानू मंडलवर बायोपिक, भूमिका साकारणार 'ही' अभिनेत्री) 

रानूंच्या बायोपिक मध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्ती मुख्य भूमिका साकारणार आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. 'मला या चित्रपटाबद्दल विचारणा करण्यात आली आहे. परंतु अद्यापही मला चित्रपटाची स्क्रिप्ट प्राप्त झालेली नाही. स्क्रिप्ट वाचल्यानंतर हा चित्रपट करायचा का नाही हे ठरवेल' अशा प्रकारे तिने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.