रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीचा खुलासा

रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत मोठा खुलासा 

Updated: Dec 30, 2020, 09:53 PM IST
रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीचा खुलासा  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)चे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अशी बातमी समोर येतेय की या दोघांनी बुधवारी रणथंभौरमध्ये साखरपुडा अथवा लग्न केलं आहे. दोन्ही कुटुंबातील मंडळी मंगळवारी जयपुर येथे पोहोचले. यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. अशा चर्चांवर रणबीर कपूरचे काका म्हणजे रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नावर अभिनेता रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी म्हटलं आहे की,'जी चर्चा होतेय ती खरं नाही. आज जर रणबीर-आलियाचा साखरपुडा असता तर मी त्यांच्यासोबत असतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranbir kapoor  (@ranbir_kapoooor)

पुढे ते म्हणाले की,'रणबीर, आलिया आणि नीतू सुट्ट्या साजऱ्या करायला गेले आहेत. नवीन वर्षांचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेले आहेत. त्यांच्या साखरपुड्याची बातमी खोटी आहे.' 

दुसऱ्या ठिकाणी नीतू कपूर, आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट सुट्यांचे फोटो शेअर करत आहेत. त्यांना सुट्यांमध्ये सोनी राजदान, रिद्धिमा कपूर साहनी, तिचा नवरा भरत साहनी आणि त्यांची मुलगी समरा देखील आहे. तसेच मंगळवारी रात्री रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण देखील सहभागी झाले