आलिया जुळ्या मुलांना देणार जन्म, Ranbir Kapoor कडून अखेर सत्य समोर!

खरंच आलिया देणार जुळ्या मुलांना जन्म, काय म्हणाला रणबीर कपूर? अभिनेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ  

Updated: Jul 19, 2022, 12:54 PM IST
आलिया जुळ्या मुलांना देणार जन्म, Ranbir Kapoor कडून अखेर सत्य समोर!  title=

मुंबई : भट्ट आणि कपूर कुटुंबालाच नाही तर, चाहत्यांना आणि संपूर्ण बॉलिवूडला अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या बाळाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. यावर रणबीर कपूरने केलेलं वक्तव्य सर्वांच्या भुवया उंचावणार आहे. सध्या रणबीर आगामी 'शमशेरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान एका खेळात रणबीरने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 

'टू ट्रुथ और एक झूठ' या खेळात रणबीरने त्याच्या जीवनातील दोन खऱ्या आणि एक खोटी गोष्ट सांगितल्या आहेत. अभिनेता म्हणाला, 'माझी जुळी मुलं असणार आहेत, मी एका पौराणिक सिनेमात दिसणार आहे, कामातून काही काळ विश्रांती घेणार आहे...', रणबीरच्या या उत्तरानंतर चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आलियावर इन्स्टाग्रामवर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील तिला शुभेच्छा दिल्या. सध्या आलिया-रणबीरच्या येणाऱ्या बाळाची चर्चा तुफान रंगत आहे.