Ranbir Kapoor and Alia Bhatt's New Car's Number Plate: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे काल एकत्र स्पॉट झाले. त्यावेळी रणबीर हा त्याची नवी लग्झरी गाडी चालवताना स्पॉट झाला. तर त्याची पत्नी आलिया ही त्याच्या शेजारी बसल्याचे देखील दिसले. त्या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे त्यांच्या गाडीच्या नंबरनं वेधलं आहे. रणबीरच्या या गाडीचा जो चार अंकी नंबर आहे त्याचा रणबीरच्या जन्माशी खास संबंध आहे.
रणबीरच्या या गाडीची किंमत तब्बल 8 कोटी आहे. तर त्याच्या या गाडीचा नंबर हा 2800 आहे. याविषयी बोलायचे झाले तर रणबीरचा जन्म हा 28 सप्टेंबर 1982 रोजी झाला होता. पापाराझींनी जेव्हा रणबीर आणि आलियाला पाहिलं आणि ते चियर करु लागले तर रणबीर त्यांना म्हणाला, 'ये, बस... आत बस' आणि त्यावेळी तिथे असलेले सगळे हसू लागले. रणबीरच्या लूक विषयी बोलायचे झाले तर नेहमी प्रमाणे त्यानं काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं आणि तो डॅशिंग दिसत होता. तर आलिया भट्टनं गुलाबी रंगाचा स्ट्रॅप ड्रेस परिधान केला होता. त्यात आलिया खूप सुंदर दिसत होती.
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट सध्या डिज्नी म्यूजिकलसाठी गुरिंदर चड्ढासोबत दिसणार आहे. तर यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उस्तुकता आहे. आलियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'हार्ट ऑफ स्टोन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर सध्या ती वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' ची तयारी करत आहे. याशिवाय आलियाकडे बॉबी देओल आणि शर्वरी वाघसोबतचा एक चित्रपट देखील आहे. तर त्याशिवाय ती रणबीर कपूर आणि विक्की कौशलच्या 'लव्ह अॅन्ड वॉर' या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात देखील दिसणार आहे.
दरम्यान, रणबीर विषयी बोलायचे झाले तर तो गेल्या अनेक दिवसांपासून नितेश तिवारीच्या रामायण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर श्री राम यांची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी रणबीरनं तयारी देखील सुरु केली आहे. तर सगळ्यात शेवटी रणबीर हा अॅनिमल या संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.