आलिया-रणबीरच्या लेकीचं नावं आलं अखेर समोर; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने केली घोषणा

आलियाने तिच्या पोस्टसोबत एक आकर्षक कॅप्शनदेखईल दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहीलंय की...

Updated: Nov 24, 2022, 08:19 PM IST
आलिया-रणबीरच्या लेकीचं नावं आलं अखेर समोर; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने केली घोषणा title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला नुकतच  कन्यारत्न प्राप्त झालं.  मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे. आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतल्याचं आपण पाहिलं होतं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी आलियासोबत पती आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) देखील होता. 

आलिया डिलीव्हरीसाठी (Alia Bhatt delivery) रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते आनंदात होते. त्यानंतर नुकताच आलियाने चाहत्यांना 'गुडन्यूज' दिली होती. आलियाच्या मुलीच्या आगमनानंतर तिचं नाव काय ठेवण्यात येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता आलिया रणबीरच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा गुडन्यूज समोर आली आहे. आलियाने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर आपल्या मुलीचं नाव जाहिर केलं आहे.

सध्या आलिया भट्ट तिचा संपूर्ण वेळ तिच्या  मुलीसोबत घालवत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपल्या मुलीच्या नावाची घोषणा एका अतिशय गोंडस पोस्टद्वारे केली आहे. या पोस्टमध्ये दोघंही आपल्या मुलीला हातात धरलेले दिसत आहेत. तसंच भिंतीवर टी-शर्टवर आलिया-रणबीर कपूरच्या मुलीचं नाव लिहिलेलं दिसत आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्री आलिया भट्ट-रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव राहा कपूर ठेवल्याचं सांगितलं आहे. हे नाव रणबीर कपूरच्या आईने म्हणजेच नीतू कपूरने निवडलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याचसोबत आलियाने तिच्या पोस्टसोबत एक आकर्षक कॅप्शनदेखईल दिलं आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहीलंय की, "आम्ही आमच्या मुलीचं नाव राहा ठेवलं आहे तिच्या आजीने हे नाव निवडलं आहे. राहा म्हणजे खूप सुंदर. राहा म्हणजे आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग. तिच्या नावाप्रमाणे, जेव्हा राहा आमच्या आयुष्यात आली, तेव्हा आम्हाला राहा या नावाचा अर्थ फिल झाला.  थँक्यू राहा तु आमच्या फॅमिलीमध्ये आलीस. तुझ्या येण्याने आम्हाला असं वाटत आहे की, आमचं आयुष्य आत्ता-आत्ता सुरु झालं आहे. आलियाने ही पोस्ट शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.