लेकाच्या लग्नात नीतू कपूर 'या' गाण्यावर धरणार ठेका 

 नीतू कपूरचा डान्स रिहर्सल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Apr 14, 2022, 02:30 PM IST
लेकाच्या लग्नात नीतू कपूर 'या' गाण्यावर धरणार ठेका  title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबद्दल जर कोणाला सर्वात जास्त उत्सुकता असेल तर ती नीतू कपूर आहे. नीतू कपूरचा डान्स रिहर्सल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रणबीर कपूरच्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

'घागरा' गाण्यावर डान्स करणार
नीतू कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिचा मुलगा रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' मधील प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

मास्टर राजेंद्र सिंग यांची कोरिओग्राफी
या व्हिडिओमध्ये नीतू कपूरसोबत एक कोरिओग्राफरही दिसत आहे. हा कोरिओग्राफर दुसरा तिसरा कोणी नसून डान्स मास्टर राजेंद्र सिंग आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, कपूर घराण्यात जेव्हा जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा सगळ्यांना डान्स कोरिओग्राफर राजेंद्र सिंहच असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नीतू कपूरला पाहून हे स्पष्ट होतं आहे की ती आपल्या मुलाच्या लग्नात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री प्रत्येक पाऊल सर्वोत्तम मार्गाने करण्याचा प्रयत्न करत आहे. या डान्ससाठी नितू खूप मेहनत घेत असल्याचंही दिसत आहे.