अयोध्यावासियांवर 'लक्ष्मण' भडकलेः राम मंदिर भूमीवरच भाजपच्या पराभवानंतर संतापला 'रामायण' फेम अभिनेता

Sunil Lahri Disappointed On Faizabad Loksbha Result : सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयोध्येच्या निवडणूकीवर व्यक्त केला संताप... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 6, 2024, 11:21 AM IST
अयोध्यावासियांवर 'लक्ष्मण' भडकलेः राम मंदिर भूमीवरच भाजपच्या पराभवानंतर संतापला 'रामायण' फेम अभिनेता title=
(Photo Credit : Social Media)

Sunil Lahri Disappointed On Faizabad Loksbha Result : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल समोर आल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य झालं. त्यात रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारत घरा-घरात पोहोचलेल्या अभिनेता सुनील लहरी यांनी निकाल पाहत नाराजी व्यक्त केली आहे. सुनील यांना सगळ्यात मोठा धक्का हा यूपीच्या फैजाबाद (अयोध्या) मतदार संघाच्या निकालानं पाहून बसला आहे. सुनील लहरी यांनी अयोध्येच्या रहिवाशांवर संताप व्यक्त केला आहे. 

सुनील यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की 'आम्ही ही विसरलोच हे तेच अयोध्येचे रहिवासी आहेत ज्यांनी वनवासावरून परतलेल्या देवी सीतेवर संशय घेतला होता. देव जरी समोर आले ना तरी त्यांना देखील नकार देतील इतके स्वार्थी हिंदू आहेत.'

ramayan serial fame Sunil Lahri Disappointed On Faizabad Loksbha Result slams citizens of ayodhya

पुढे सुनील म्हणाले की 'अयोध्येतील नागरिकांनी आपल्या खऱ्या राजाचा नेहमीच विश्वासघात केला याचा पुरावा इतिहासातही आहे.' सुनील हे इथेच थांबले नाही तर त्यांनी पुढे देखील एक पोस्ट शेअर केली की 'अयोध्येतील रहिवाशी तुमच्या महानतेसाठी सलाम आहे. तुम्ही तर माता सीताला सोडलं नाही तर रामाला टेंटमधून बाहेर आणून भव्य मंदिरात स्थापना करणाऱ्यांना धोका देणं कोणती मोठी गोष्ट आहे. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार. संपूर्ण भारत तुम्हाला आदरानं पाहणार नाही.' फैजाबादच्या मतदार संघाविषयी बोलायचे झाले तर सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांचा 54567 मतांनी पराभव केला आहे. 

दरम्यान, सुनील लहरी यांचे 'रामायण' या मालिकेतील सह-कलाकार अरुण गोविल यांनी उत्तर प्रदेशच्या मेरठच्या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढली इतकंच नाही तर ते विजयी देखील ठरले. सुनील लहरी यांनी अरुण गोविल यांना शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते म्हणाले की 'मला आनंद आहे की दोन लोक, जे मला खरंच आवडतात. सगळ्यात आधी कंगना रणौत. ती महिला सशक्तिकरणाची प्रतीक आहे आणि तिनं (हिमाचल प्रदेश) मंडी मधून विजय मिळवला आहे. दुसरी व्यक्त माझे मोठे भाऊ अरुण गोविल त्यांनी मेरठमधून विजय मिळवला आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा.'