हिंदी सिनेमांच्या अपयशामुळे ढासळत आहे देशाची अर्थव्यवस्था? रकुल प्रीत सिंगच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ

रकुल प्रीत ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Oct 12, 2022, 12:00 PM IST
हिंदी सिनेमांच्या अपयशामुळे ढासळत आहे देशाची अर्थव्यवस्था? रकुल प्रीत सिंगच्या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रकुल सध्या 'डॉक्टर जी' (Doctor G) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्तानं रकुल सगळीकडे चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत रकुलनं चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या कमी प्रतिसादावर वक्तव्य केलं आहे. 

बातमीची लिंक : स्पर्धकाला एक चूक ठरली महागात, नाही तर जिंकला असता 7.5 कोटी; तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर?

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये रकुलनं हिंदी चित्रपटांना प्रेक्षक कमी प्रतिसाद देत असल्याची कबूली दिली आणि त्यामागील कारण स्पष्ट सांगितलं. 'समाजासाठी अयोग्य असणाऱ्या गोष्टींवर बहिष्कार करायला हवा. पण त्याआधी संबंधित विषयावर चर्चा व्हायला हवी. चर्चा न करता फक्त एका मुद्दयाच्या आधारावर चित्रपटांना बॉयकॉट करणं चुकीचे आहे. त्याच्या परिणाम कलाकारांसह संपूर्ण इंडस्ट्रीवर होत असतो,' असे रकुल म्हणाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे या विषयी सविस्तर सांगताना रकुल म्हणाली की 'इंडस्ट्रीचे याच्यामुळे नुकसान होत आहे. अनेक चित्रपटांना या सगळ्याचा सामना करावा लागत आहे. तर हे असं आहे की एकामागे एक साखळीसारखं हे पाळलं जात आहे. एकीकडे आपलं सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे इतरांनी असं काही करायला नको. '

दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये बॉलिवूडमध्ये चित्रपटांना नकारात्म प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांना बॉयकॉट करण्यात येत आहे. याचा फटका ‘लाल सिंह चड्ढा’, 'लाइगर', ‘रक्षाबंधन’ अशा बिगबजेट चित्रपटांना बसला आहे. 

‘डॉक्टर जी’ या चित्रपटात रकुल फातिमा ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटानंतर तिचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 2022 मध्ये रकुलचे ‘अटॅक’, ‘रनवे 34’, ‘कटपुतली’ असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तसेच ती ‘इंडियन 2’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिसणार आहे.