या कारणासाठी रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी त्यांचं नातं अधिकृत केलं

एक रोमँटिक फोटो शेअर करत जॅकीने चाहत्यांना ही खुशखबर दिली होती

Updated: Jan 16, 2022, 02:25 PM IST
या कारणासाठी रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी त्यांचं नातं अधिकृत केलं title=

मुंबई : गेल्या वर्षी, रकुल प्रीत सिंगच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांचं नातं अधिकृत केलं होतं. एक रोमँटिक फोटो शेअर करत जॅकीने चाहत्यांना ही खुशखबर दिली.

फोटोमध्ये रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. पोस्ट शेअर करत जॅकीने लिहिलं होतं की, जेव्हा तुम्ही एकत्र नसता तेव्हा दिवस अपूर्ण वाटतो. अगदी स्वादिष्ट जेवणदेखील तुझ्याशिवाय खायला मजा येत नाही. जगातील सर्वात सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहे. जी माझं जग आहे. माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

त्याचबरोबर रकुल प्रीत सिंगने ही पोस्ट पुन्हा रिपोस्ट करत जॅकीचे आभार मानले. रकुलने जॅकीला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गिफ्ट म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला हे रिलेशनशिप ऑफिशियल करणं योग्य का वाटलं.

मुलाखतीत रकुलने सांगितलं होतं की, तिला माहित आहे की, जॅकी तिला शुभेच्छा देईल. असो, आम्ही आमचं नातं ऑफशियल करण्याचा विचार करत होतो. रकुल पुढे म्हणाली की, तिला वाटलं की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि फक्त दोन शब्द जॅकीच्या शुभेच्छा म्हणून येतील. रकुल प्रीत सिंहच्या म्हणण्यानुसार, तिला माहित नव्हतं की जॅकी तिला कविताच्या रूपात शुभेच्छा देईल. याबाबत पुढे बोलताना रकुल म्हणाली की, आम्हा दोघांना वाटायचं की, आपण रिलेशनशिपमध्ये आहोत तर ते का लपवायचं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या दोघांना त्यांच्या नात्यात एकच गोष्ट मौल्यवान वाटते ती म्हणजे, तुम्ही एकत्र असाल तर तिचा आदर करा आणि नक्कीच व्यक्त करा. आम्ही अनेकदा जोडप्यांना पाहिलं आहे की, ते नाते लपवतात. लपून पळणं योग्य नाही. नातं लपवून पळून जावं असं आमच्या दोघांच्याही मनात आलं नाही.या बाबतीत आम्ही दोघंही एकमेकांचा आदर करतो.