Rakhi Husband Adil Khan: ...म्हणून राखीचा नवरा आदिल खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Rakhi Husband Adil Khan Arrested: राखी सावंतने अलीकडेच आपला बॉयफ्रेंड आदिलसह लग्न केले होते. पण काहीच दिवसात राखी व आदिलच्या नात्यात कटुत्व आले आहे. राखी अनेकदा मीडियासमोर येऊन आदिलवर आरोप करत असते.

Updated: Feb 7, 2023, 02:22 PM IST
Rakhi Husband Adil Khan: ...म्हणून राखीचा नवरा आदिल खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या! title=

Rakhi Husband Adil Khan Arrested: अभिनेत्री राखी सावंत व मॉडेल ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आता राखीच्या संसारात वादळ आलं असून पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला होता. या घटनेनंतर राखीने आदिलविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर आदिल खानला  मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अद्याप अज्ञात असले तरी, हे राखीच्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे राखीने तक्रार दाखल केली असं सांगण्यात येतंय 

आदिलचे अन्य मुलींसह संबंध?

राखीच्या आईचे निधन झाल्यावर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. राखी रडताना लग्न तुटल्याचेही दुःख व्यक्त करत आहे. राखीच्या म्हणण्यानुसार तिचा नवीन नवरा आदिलचे अन्य मुलींसह संबंध आहेत म्हणूनच त्याने तिला त्या दोघांचं नातं लपवून ठेवण्यास सांगितलं होतं. राखी म्हणते की, “मी त्याला एक नव्हे 10 वेळा संधी दिली पण तो प्रामाणिक नाही. 

राखीने आदिलला दिली धमकी

आदिल पुढे लिहीतो की, “मी ज्या दिवशी माझं तोंड उघडेन आणि ती माझ्यासोबत काय वागतेय हे सांगेन तेव्हा ती कधीच स्वतःचं तोंड उघडू शकणार नाही. ती रोज लोकांसमोर येऊन मी वाईट आहे हे सांगते म्हणते की मला फ्रीजमध्ये जायचं नाही पण मी सुद्धा हे म्हणू शकतो की मला सुशांत सिंहा राजपूत व्हायचं नाही. राखी मीडियाला माझ्याशी बोलू देत नाही कारण तिला माहित आहे की मी येऊन सगळं खरं सांगून टाकेन.” राखी सावंत व आदिल खानने मे महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, लग्नाच्या सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. तेव्हाही बऱ्याच दिवसांच्या ड्रामानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.  

राखीच्या आरोपांवर आदिलचे उत्तर

आदिलने अखेरीस राखी सावंतच्या सर्व आरोपांवर एकाच पोस्टमधून उत्तर दिले आहे. त्याने म्हंटले की, “मी कोणत्या बाईच्या बद्दल वाईट बोलत नाही म्हणून मी शांत आहे पण याचा अर्थ हा नाही की मी चुकलोय. मी माझ्या धर्माचा आदर करतो.”