Anil Ambani च्या लग्नात गरीबीमुळे जेवण वाढायची 'ही' अभिनेत्री, आज आहे करोंडोंची मालकीण!

या लग्नाला अशाच एका अभिनेत्रीनं हजेरी लावली होती परंतु ती तेव्हा कोणी मोठी सेलिब्रेटी नव्हती.  

Updated: Sep 14, 2022, 08:17 PM IST
Anil Ambani च्या लग्नात गरीबीमुळे जेवण वाढायची 'ही' अभिनेत्री, आज आहे करोंडोंची मालकीण! title=

Rakhi Sawant Struggle Story: आज अंबानी बंधूंचं (Ambani Brothers) नाव जगात मोठ्या क्रमांकावर आहे. आज त्यांची गणना अब्जावधींच्या मालकांमध्ये केली जाते. बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे भाऊ आणि रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांनी अभिनेत्री टीना अंबानी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी टीना अंबानी आणि अनिल अंबानी (Tina Ambani and Anil Ambani Marriage) यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. (rakhi sawant who served food at anil ambanis wedding for 50 rupees is now the highest paid actress in bollywood)

या लग्नाला अशाच एका अभिनेत्रीनं हजेरी लावली होती परंतु ती तेव्हा कोणी मोठी सेलिब्रेटी नव्हती. तर चक्क ती त्यांच्या लग्नात जेवण वाढायला म्हणून आली होती. ज्याच्यासाठी तिला फक्त 50 रूपये मानधन म्हणून मिळणार होते. पण आज हीच अभिनेत्री लाखो करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. आणि ती अभिनेत्री आहे बॉलीवूडची मोस्ट कॉट्रोव्हर्शिल आणि आयटम गर्ल राखी सावंत. (Rakhi Sawant) 

राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा तिच्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहते परंतु तिने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या लग्नात जेवण वाढले होते. तेव्हा तिला त्या कामासाठी केवळ 50 रूपये देण्यात आले होते. राखीने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. 

आज राखी सावंत करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे आणि तिचा मुंबईच्या पॉश भागात एक आलिशान बंगलाही आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखीचं बालपण असं होतं - 
राखीने या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती 11 वर्षांची होती तेव्हा तिने दांडिया करण्याचा हट्ट धरला होता आणि तिची आई आणि मामाने तिचे लांब केस कापले होते. यामुळे ती दिवसभर रडत होती. राखीने सांगितले होते की त्याच दिवशी तिने ठरवले होते की ती काहीही करेल, ती तिच्या कुटुंबाच्या विरोधात जाईल.