राखी सावंतने शेअर केला नवविवाहित जोडप्याचा असा फोटो; पाहून चाहते थक्क

 राखीने स्वत: एक असा फोटो शेअर केला आहे जो पाहून चाहते हैराण झाले आहेत. जाणून घेवूयात या फोटोबद्दल.

Updated: Mar 24, 2024, 04:49 PM IST
राखी सावंतने शेअर केला नवविवाहित जोडप्याचा असा फोटो; पाहून चाहते थक्क title=

मुंबई :  ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या दिवसांत राखी तिच्या एक्स पती आदिल खान दुर्रानीच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत असते. आदिलने बिग बॉस फेम सोमी खानसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर आदिल आणि सोमी लागोपाठ स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर राखीने आदिलला घेवून एक व्हिडीओ शेअर करुन आपला राग व्यक्त करताना दिसली आहे. या दरम्यान आता राखीने स्वत: एक असा फोटो शेअर केला आहे जो पाहून चाहते हैराण झाले आहेत. जाणून घेवूयात या फोटोबद्दल.

कोणाचा आहे हा फोटो?
खरंतर राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राममार्फत नवविवाहित जोडीचा एक फोटो शेअर केला आहे. हा एक कॉमेडी फोटो आहे. ज्यामध्ये दोन माकड सुंदर लग्नाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. दोघांच्या हातात फुलाचा हार आहे आणि दोघंही प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहून प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत राखीने प्रश्न विचारला आहे की, 'पहचाना कौन है?' मग काय राखीच्या या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

युजर्सच्या कमेंट्सचा पूर
सध्या राखीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत युदर्सने या नवविवाहित माकडाच्या जोडीला आदिल खान दुर्रानी आणि सोमी खान म्हणत खूप मज्जा घेतली आहे. याचबरोबर राखीच्या या पोस्टवर राखीचा एक्स पती रितेश सिंहचीदेखील कमेंट आली आहे. रितेशने हसण्याचे इमोजी शेअर केल्या आहेत. तर एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, काही खान ज्यांना प्रसिद्ध व्हायचे आहे आणि आदिल जो राखी सावंतचा आधीच प्रसिद्ध आहे... तर अजून एकाने लिहीलंय, जेव्हा आदिल राखीसोबत होता आता तो सोमीचा नवरा झाला. तर अजून एकाने लिहीलंय की, अर्थात आदिल भगोरा आणि त्याची नल्ली बायको. तर अजून एकाने लिहीलंय, 'शेवटी राखीने रिएक्ट केलं ते पण 100% खरं आहे.'' अशा अनेक प्रकारच्या कॉमेडी कमेंट युजर्स या पोस्टवर करत आहेत. तर अनेकांनी मात्र राखीला ट्रोलही केलं आहे. एकाने लिहीलंय की, ''कधी जाणर तुझा पोरकटपणा.'' तर अजून एकाने लिहीलंय, ''हे सगळ्यांना माहितीये की, कोणी कोणाला सोडलंय.''