आसारामवर टीका करणाऱ्या राखीनं शेअर केला 'राधे माँ'चा व्हिडिओ

. राखी सावंतनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ट्विटरवासियांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

Updated: Apr 26, 2018, 07:15 PM IST
आसारामवर टीका करणाऱ्या राखीनं शेअर केला 'राधे माँ'चा व्हिडिओ  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हिनं गुरुवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून राधे माँचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत राधे माँ आपल्या भक्तांसमोर डान्स करताना दिसतेय. राखी सावंतनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ट्विटरवासियांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय. 'राखीजवळ काही काम नसल्याचीही' प्रतिक्रिया ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओवर एका युझरनं म्हटलंय 'मॅडमजी तुम्हाला कोणतंही काम नाही. असाधारण महिलांची लीग!!!' 

उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी राखी सावंतनं आसारामला मिळालेल्या आजन्म तुरुंगवासाच्या शिक्षेवर प्रतिक्रिया नोंदवली होती. एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंभू संत आसाराम बापूला शिक्षा मिळाल्यानं आपण खूप खुश असल्याचं राखीनं म्हटलं होतं. राजस्थानच्या जोधपूर स्थित आपल्या आश्रमात वर्ष 2013 मध्ये 16 वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयानं आसारामला बुधवारी दोषी ठरवलं होतं... आणि  त्यानंतर आजन्म जन्मठेपेची शिक्षाही सुनावली. 

 

को Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) द्वारा साझा की गई पोस्ट

राखीनं म्हटलंय, 'मला खूप आनंद झालाय की आसारामला शिक्षा सुनावण्यात आलीय. असे विचार असणाऱ्यांसाठी हे एक चांगलं उदाहरण आहे. खासकरून असे लोक जे श्रीमंत आणि शक्तीशाली आहेत म्हणून महिला आणि मुलांसोबत काहीही चुकीचं करू शकतात... परंतु, या प्रकरणात फाशीची शिक्षा का सुनावण्यात आली नाही. मुलगी अल्पवयीन होती, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना ना जामीन मिळायला हवा ना त्यांना आयुष्य दिलं जावं'.