राखी सावंतच्या चहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या खूप खुश आहे.

Updated: Apr 12, 2022, 03:48 PM IST
राखी सावंतच्या चहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन title=

मुंबई :  बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या खूप खुश आहे. राखीच्या आनंदाचं कारणही खूप खास आहे. खरंतर राखी सावंतला तिची ड्रीम कार मिळाली आहे. सोशल मीडियावर तिच्या नव्या कारची झलक दाखवण्यात आली आहे.

तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या नवीन BMW कारसोबत दिसत आहे. राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यादरम्यान ती खूप आनंदी दिसत आहे. तिच्यासोबत आणखी काही लोकं आहेत ज्यांच्यासोबत ती केक कापत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. राखीने सांगितलं आहे की, तिला ही कार भेट म्हणून मिळाली आहे.

व्हिडिओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या 'लव'ने मला माझी नवीन कार गिफ्ट केली आहे. मात्र, ही कार तिला कोणी भेट दिली याचं स्पष्टीकरण तिने दिलेलं नाही. ही कार तिला कोणी दिली, असा प्रश्नही चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिला विचारत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये राखी सावंतचं खूप कौतुक होत आहे. चाहते तिचं अभिनंदन करत आहेत आणि नवीन कारसाठी तिला शुभेच्छाही देत आहेत.

पती रितेशपासून विभक्त होण्याआधी राखी सावंत मर्सिडीजच्या शोरूममध्ये दिसली होती. जिथे ती कार पाहण्यासाठी पोहोचली होती. शो रुममध्ये राखीसोबत रितेशही उपस्थित होता. व्हॅलेंटाइन डेला तिला खूप महागडं गिफ्ट मिळणार आहे. असं राखीने एक्सप्रेशनव्दारे सांगितलं होतं.

मात्र, तसं काहीही झालं नाही. फेब्रुवारीमध्ये राखी आणि रितेशचं नातं कायमचं तुटलं. दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला आणि आपापल्या आयुष्यात पुढे गेले. काही दिवसांपूर्वी राखी सावंतने एका मुलाखतीदरम्यान रितेशपासून वेगळं होण्यामागचं कारण सांगितलं होतं.

राखी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली, 'मी नाही तर रितेशने माझ्यासोबतचं नातं संपवलं आहे. तो सकाळी उठला आणि त्याने बॅग भरायला सुरुवात केली आणि सांगितलं की, तो माझ्यासोबत राहू शकत नाही कारण त्याला त्याची एक्स पत्नी स्निग्धा प्रियाशी त्याला काही कायदेशीर समस्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतीच राखी सावंत 'बिग बॉस' स्पर्धक निशांत भट्टच्या बर्थडे पार्टीत दिसली होती. यावेळी  राखी अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये तिचे कर्व्ह फ्लॉंट करताना दिसली होती.