मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी म्हणून कुटुंब आणि चाहते प्रार्थना करत आहेत. रोज त्यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. नुकताचं राजू यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत. संपूर्ण कुटुंब राजू यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत, तर डॉक्टर देखील त्यांचे प्रयत्न करत आहेत.. अशी माहिती दीपू यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली आहे.
व्हिडीओमध्ये दीपू श्रीवास्तव म्हणाले, 'राजूश्री वास्तव सध्या एम्समधील आयसीयूमध्ये दाखल आहेत. राजू यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टर त्यांचे 100% देत आहेत. राजू यांना चांगले उपचार मिळत आहेत. त्यांची प्रकृती देखील सुधारत आहे. अफवांवर लक्ष देऊ नका, आमचे भाऊ लढवय्ये आहेत. ते लवकरच आपल्या कॉमेडीचे दुकान उघडण्यासाठी आपल्या सर्वांसमोर येणार आहेत.'
काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर नयन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. आता नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये राजू यांनी हात आणि शरीराचे काही भाग हलवू लागले आहेत.
दरम्यान, डॉक्टरांनी राजूच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांनाही भेटण्यास मनाई केली आहे. याचे कारण संसर्गाची भीती सांगितली आहे. व्हेंटिलेटरवर संसर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे आता कोणीही राजू यांना भेटू शकत नाही.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्टला वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी राजू श्रीवास्तव सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक बेशुद्ध होऊन ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.