अमिताभ यांची मिमिक्री करून कॉमेडी किंग झाला, 41 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Raju Srivastava Death Anniversary : अमिताभ यांची मिमिक्री करून कॉमेडी किंग झाला 'हा' अभिनेता...

दिक्षा पाटील | Updated: Sep 21, 2024, 04:13 PM IST
अमिताभ यांची मिमिक्री करून कॉमेडी किंग झाला, 41 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर घेतला अखेरचा श्वास title=
(Photo Credit : Social Media)

Raju Srivastava Death Anniversary : कॉमेडी किंग म्हणून ओळख असणारा दिवंगत राजू श्रीवास्तवचा आज स्मृती दिवस आहे. 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यानं अखेरचा श्वास घेतला. सगळ्यांना खळखळून हसवणारा कॉमेडीय एक दिवस अचानक सगळ्यांना सोडून गेला. त्यानं फक्त एक कॉमेडीयन म्हणून काम केलं नाही तर त्यासोबत स्वत: चं स्थान देखील निर्माण केलं आहे. त्याचे निधन होण्याआधी जवळपास दीड महिन्यापर्यंत तो कोम्यात होता. 

राजूविषयी बोलायचे झाले तर त्याला शाळेत असल्यापासून मिमिक्रीची आवड होती. मुंबईत येण्याआधीपासून उत्तरप्रदेशमधील लोक त्याला ओळखायचे.  राजू श्रीवास्तवला आयुष्यात काही करायचं होतं. त्यामुळे मुंबईत स्वप्न पूर्ती करण्यासाठी आलेल्या राजू श्रीवास्तवला हळू-हळू काम मिळू लागलं. त्याला छोट्या-मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्याला ज्याही भूमिका मिळाल्या त्यानं त्या मेहनतीनं केल्या. हिंदी चित्रपटांसोबतच त्यानं अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलं. सुरुवातीला तो अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करायचा पण त्यानंतर त्यानं अभिनय क्षेत्रात स्वत: चं नशिब आजमावण्याचं ठरवलं. 

राजू श्रीवास्तवनं त्याच्या करिअरमध्ये ‘मैंने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. तर त्याला 2005 मध्ये स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून त्याचं नशिब आजमावलं. त्याला ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' आणि त्यात साकारलेल्या भूमिकांसाठी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर त्यानं मागेवळून पाहिलं नाही. तो सर्वसामान्य माणूस आणि रोजच्या जीवनातील छोट्या-मोठ्या घटनांवर व्यंग ऐकवू लागला. 

राजू श्रीवास्तव हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय शो ‘कॉमेडी का महाकुंभ’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘शक्तिमान’ आणि ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्यानं राजकारणात देखील स्वत: चं नशिब आजमावलं होतं. 2014 मध्ये सपामध्ये तो सहभागी झाला होता आणि इतकंच नाही तर त्यानं लोकसभासाठी तिकिट देखील मिळवलं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणूकीसाठी त्याला तिकिट मिळालं नाही, पण स्वच्छ भारत मिशनचा ब्रॅंड एम्बॅसिडर तो नक्कीच झाला.  

हेही वाचा : सोमवारी लग्न झालं, बुधवारी कपल थेरेपीला पोहोचले फरहान अख्तर आणि शिबानी

2019 मध्ये उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचा तो चेअरमॅन देखील झाला. सगळं काही ठीक होतं पण मग 10 ऑगस्ट 2022 रोजी ट्रेडमिलवर धावत असताना तो पडला आणि त्यानंतर तो उठू शकला नाही. त्याला हार्ट अटॅक आला त्यानंतर त्याची अॅन्जियोप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर तो वेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं. तो रिकव्हर करू शकला नाही आणि त्यानं 1 महिना 11 दिवसांनंतर अखेरचा श्वास घेतला.