मुंबई : बाहुबली या चित्रपटाने यंदाच्या वर्षी बॉक्सऑफिसवर दमदार कमाई केली.
देशा - परदेशामध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच गेल्या वर्षभरापासून 'कटप्पा'ने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचे गूढ उकलले.
दोन भागांमध्ये सुमारे २ वर्षांहून अधिक काळ 'बाहुबली' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसर्या भागाचे मूळ आकर्षणच ' कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्नाभोवती होते.
बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक राजमौली यांनी अखेर या प्रश्नामागचं गुपित उलगडले आहे. ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्विस सावनचा शो 'टेक 2 विथअनुपमा एंड राजीव' या कार्यक्रमामध्ये राजमौली यांनी याबाबातचा खुलासा केला.
कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे रहस्य जपणं किती कठीण होतं ? याबद्दल विचारणा केल्यानंतर राजमौली म्हणाले , ' चित्रपट तुम्ही दोनदा नीट बघितला असता तर तुम्हांला याचा अंदाज लावू शकता येतो. अनेकांनी त्याबाबत ट्विटरवर योग्य तर्क लावला होता.
बाहुबलीला का मारला ? यापेक्षा कसं मारलं हा प्रश्न कठीण होता. त्याचा अंदाज लावणं कठीण होतं.
बाहुबलीच्या दुसर्या भागामध्ये कटप्पाने बाहुबलीला का मारले? याबाबतचे रहस्य उलागडणार होते. मात्र टीमामध्येही १०-१५ लोकांना पूर्ण कथा ठाऊक होती.
चित्रपटाचे शूटिंग हे सलग भागामध्ये केले जात नसे. त्यामुळे अनेकदा टीममधील लोकांनादेखील अंदाज लावणं शक्य नव्हतं. त्यांचाही गोंधळ होत होता.