मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत या वीकेंडला लग्न करणार आहे. राजकुमार राव त्याच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे आणि त्याने आपल्या भावी पत्नीसाठी एक अद्भुत भेटवस्तू देखील आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या दिवशी अभिनेता पत्रलेखाला प्रेमाचे खास गिफ्ट देणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, राजकुमार राव डेटिंगच्या काळापासून पत्रलेखाला हाताने लिहिलेली प्रेमपत्रे देत आहे आणि त्यापैकी अनेक अजूनही त्यांच्यासोबत आहेत, जी त्याने पत्रलेखाला दिलेली नाहीत.
एका जवळच्या सूत्राने ही माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, “राजकुमारचा प्रेम दाखवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. तो आणि पत्रलेखा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि यादरम्यान तो तिला पत्र लिहायचा.
याचं एक कारण म्हणजे शूटिंगच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे तो पत्रलेखासोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हता, त्यामुळे तो तिला पत्र लिहायचा. आता तिच पत्रे लग्नात भेट म्हणून देण्याचा विचार राजकुमार करत आहेत, जे त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे.