Rajiv Kapoor Demise : म्हणून राजीव कपूर यांच्या मरणोत्तर 'हा' विधी नाही

 राजीव कपूर यांच्यावर अंत्यविधी मंगळवारी करण्यात आला. यावेळी कपूर कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. रणबीर कपूर आणि अरमान यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील पार्थिवाला खांदा दिला.

Updated: Feb 10, 2021, 03:11 PM IST
Rajiv Kapoor Demise : म्हणून राजीव कपूर यांच्या मरणोत्तर 'हा' विधी नाही title=

मुंबई : राज कपूर (Raj Kapoor) यांचे सुपुत्र आणि ऋषी कपूर-रणधीर कपूर यांचे लहान भाऊ राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने निधन झाले आहे. राजीव कपूर यांच्यावर अंत्यविधी मंगळवारी करण्यात आला. यावेळी कपूर कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. रणबीर कपूर आणि अरमान यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील पार्थिवाला खांदा दिला. आता मिळालेल्या माहितीनुसार, राजीव कपूर यांचे मरणोत्तरानंतरचे चौथ्या दिवसाचे विधी होणार नाही. याबाबत नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 

कपूर कुटुंबातील काही सदस्य आणि राजीव कपूर यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी नीतू कपूर यांची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,'कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राजीव कपूर यांच्या मरणोत्तरानंतरचा चौथ्या दिवसाचा विधी होणार नाहीत.  सुरक्षेच्या कारणाने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

रणधीर कपूरने व्यक्त केलं दुःख

अभिनेते आणि राजीव कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर  यांनी या दुःखद घटनेची माहिती दिली होती. त्यांनी म्हटलं की,'मी माझा लहान भाऊ गमावला. आता ते या जगात नाहीत. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले.'

घरातील मंडळी प्रेमाने बोलत होते 'चिम्पू'

अभिनेता राजीव कपूर (Rajiv Kapoor) राज कपूर यांचे सर्वात लहान सुपुत्र. ज्यांना घरातील मंडळी लाडाने चिम्पू असं म्हणत असतं. असं सांगितलं जात आहे की, राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला यामध्येच त्यांचं निधन झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.