रजनीकांतच्या काला चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलेला कुत्रा

महागडे कुत्रे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असतील...पण दोन कोटी रुपयांचा कुत्रा तुम्ही कधी पाहिलाय का?

Jaywant Patil Updated: Mar 13, 2018, 12:26 AM IST
रजनीकांतच्या काला चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलेला कुत्रा title=

मुंबई : आता एक आगळीवेगळी बातमी.....महागडे कुत्रे तुम्ही पाहिले किंवा ऐकले असतील...पण दोन कोटी रुपयांचा कुत्रा तुम्ही कधी पाहिलाय का? नाही ना? मनी असं या कुत्र्याचं नावं आहे....या कुत्र्याचा चक्क लिलाव करण्यात आला...आणि लिलावात 2 कोटींपर्यंत बोली लावली गेली. 

मनी नावाच्या कुत्र्याची जगभर चर्चा

कारण हा कुत्रा सुपरस्टार रजनीकांतसोबत आगामी काला या चित्रपटाच्या पोस्टरवर झळकलाय. त्यामुळे या मनी नावाच्या कुत्र्याची जगभर चर्चा सुरू आहे. भारतासारखेच रजनीकांतचे मलेशियात मोठ्या संख्येनं चाहते आहेत. त्याच्या चाहत्यांनीच हा कुत्रा विकत घेण्याची तयारी दाखवली.

मनीसाठी तब्बल 2 कोटी रुपये मोजण्याची तयारी

विकत घेणा-यांची संख्या वाढल्यानं मनीचा लिलाव करण्यात आला. या लिलावात मनीसाठी तब्बल दोन कोटी रुपये मोजण्याची तयारी रजनीच्या एका चाहत्यानं दर्शवलीय. काला या चित्रपटासाठी तब्बल 30 कुत्र्यांची ऑडिशन घेण्यात आली. त्यातून मनीला रजनीसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.