मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध बिझनेसमेन राज कुंद्राला काल रात्री अटक करण्यात आली. राजवर अश्ली-ल सिनेमा बनवण्याचा आणि काही अॅप्सवर अपलोड केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच त्वरित कारवाई करत आहे. या प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी यापूर्वीच महाराष्ट्र सायबर सेलकडे आपली निवेदने दाखल केली आहेत. राज कुंद्रा यांचं नाव त्यांच्याच निवेदनातून समोर आलं आहे.
शर्लिनने याआधी दिलं होतं निवेदन
मुंबई पोलिसांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये सॉफ्ट पॉ-र्नोग्राफी संबधित फिल्म बनवण्यासाठी आणि अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. 26 मार्चला मुंबई पोलिसांनी या प्रकाणात एकता कपुरचं स्टेटमेंन्ट घेतलं होतं. महाराष्ट्र सायबर सेलने याआधी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेचं स्टेटमेंन्ट नोंदविली आहेत. राज कुंद्राच्य विरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता क्राईम ब्रांचच्या टीमने त्याला अटक केली आहे.
शर्लिन चोप्राने घेतलं राज कुंद्राचं नाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राविरोधात ठाम पुरावे आहेत. एफआयआरनुसार राजकुंद्राचं नाव शर्लिन चोप्राने या प्रकरणात पोलिसांसमोर घेतलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असं म्हणाली की, राज कुंद्रानेच तिला अश्लिल उद्योगात आणलं. शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये पैसे दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे 15 ते 20 प्रकल्प केले आहेत.
अशाप्रकारे राज करायचा डर्टी फिल्म
मुंबई पोलिस आयुक्तांनी निवेदन जारी करत म्हटलं आहे की, तपासा दरम्यान असं आढळले की, राज कुंद्रा या रॅकेटचा मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध पोलिसांना पुष्कळ ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यानंतरच त्याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. आज मुंबई पोलिस राज कुंद्राला कोर्टात हजर करतील. पोलिसांचा असा दावा आहे की, राज कुंद्रा आपल्या एका नातेवाईकासोबत यूके बेस्ड कंपनी स्थापन केली होती आणि ही कंपनी अनेक एजंट्सना अश्ली-ल फिल्मसाठी कॉन्ट्रॅक्ट देतं.