राहूल वैद्य आणि दिशा परमारचे लिपलॉक... विमानातले फोटो समोर

कुठेही आले तरी एक्टर्स आणि एक्ट्रेसेसना चांगला स्कोप मिळतो. 

Updated: Jul 18, 2022, 01:59 PM IST
राहूल वैद्य आणि दिशा परमारचे लिपलॉक... विमानातले फोटो समोर title=

मुंबईः टेलिव्हिजिन क्षेत्रात आजकाल सगळ्यांचीच हवा आहे. त्यामुळे टीव्ही मालिका असो नाहीतर रिएलिटी शो. कुठेही आले तरी एक्टर्स आणि एक्ट्रेसेसना चांगला स्कोप मिळतो. त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते. त्यातून लोकप्रिय ठरलेल्या हिरो आणि हिरोईन्सना चांगला चेहरा तर मिळतोच पण त्याचसोबत कोणी रिलेशनशिप्समध्ये अडकेलच तर त्यांची जोरदार चर्चाही सुरू होते. 

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी लंडन, युनायटेड किंग्डममध्ये त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. हे दोघे गेल्या काही दिवसांपासून सुट्टीतले त्यांचे हटके फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत आहेत त्यामुळे या खास प्रसंगी राहुलने दिशासाठी एक खास ट्रिप प्लॅन केली. 

ते दोघंही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने लंडनला जात आहेत. लंडनला जाण्यासाठी विमानात प्रवास करतानाचा त्यांनी लिपलॉक करत एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे जो भलताच व्हायरल झाला आहे. 

पहिल्या एनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देत हा फोटो राहूलने दिशासाठी इन्टाग्रामवरून शेअर केला आहे. 1 वर्ष खूप वेगाने निघून गेले... तुझ्यासारखा जीवनसाथी मिळाल्याबद्दल मी खूप धन्य आहे! पुढील 7 जन्मांसाठी खरोखरच मला तू आणि फक्त तूच हवी आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो वाईफ! आणखी अनेक वर्षे असेच आनंद आणि गोंडस क्षण एकत्रित जावो, अशी भावूक पोस्ट यावेळी राहूलने केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राहुलच्या पोस्टने नेटिझन्सनाही अक्षरक्षः घायाळ केले आहे. "Awww खूप क्यूट," अशी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्यांच्या या फोटोवर कमेंट केली आहे तर सोशल मीडियावरूनही मोठ्यांनी त्यांना अनेक आशीर्वादही दिले आहेत. 

राहुल आणि दिशा यांनी 16 जुलै 2021 रोजी लग्न केले. याआधी ते काही वर्षे डेटिंग करत होते आणि नंतर राहुलने तिला बिग बॉस 14 च्या एका एपिसोडमध्ये प्रपोज केले.