मुंबई : गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्याला कारण देखील तस्संच आहे. राहुल देशपांडे लोकप्रिय आहेतच पण त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रेणुका (Renuka Rahul Deshpande) देखील लोकप्रिय आहे. राहुल देशपांडे यांनी रेणुकाचा (Renuka turns 6 years old) एक व्हिडिओ पोस्ट केलाय.
रेणुका राहुल देशपांडे हिचा आज वाढदिवस. रेणुका सहा वर्षांची झाली आहे. यावर आपला काय? तर तिचाही विश्वास बसत नाही. हेच सगळं सांगणारा हा व्हिडिओ राहुल देशपांडे यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये रेणुका म्हणतेय की,'मला विश्वासच बसत नाही मी सहा वर्षांची कशी झालीय. मी पाचच्या पुढे कशी जातेय? असा प्रश्न देखील तिने यामध्ये विचारला आहे. या व्हिडिओत रेणुका राहुल देशपांडे यांच्या मांडीवर बसली आहे. तर सोबत तिच्या आईचा आवाज देखील येत आहे. कॉमेडी आहे एक नंबर, असं नेहा देशपांडे रेणुकाला म्हणतं आहेत.
रेणुकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.या व्हिडीओमध्ये ती गाणी गाताना दिसते, तर कधी अवखळ अभिनय करताना दिसते. रेणुकाचा निरागस स्वभाव नेटकऱ्यांना भावला असून तिच्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव सतत होत असतो.
राहुल देशपांडे त्यांच्या फेसबुक पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करतात. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची जेवढी प्रसिद्धी आहे तेवढीच प्रसिद्धी आता त्यांच्या मुलीला रेणुका देशपांडेलाही मिळत आहे.
कोणत्याही स्टारकिडपेक्षा राहुल देशपांडेच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. निरागस रेणुका विविध हावभाव करताना काढलेले फोटो देखील चाहत्यांना आवडतात. 'मोहे रंग दो लाल' या गाण्यावर तिच्या अभिनयाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.