मुंबई : घटस्फोट... एखाद्या नात्याचा अंत... अनेक जोडप्यांसाठी दु:खद आणि त्रासदायक असतो. परंतु, एमटीव्ही च्या रोडीजमध्ये जज म्हणून दिसणाऱ्या रघु राम आणि त्याच्या पत्नीसाठी मात्र घटस्फोट तितकासा त्रासदायक नाही, असंच त्यांच्या पोस्टवरून दिसतंय.
रघु रामनं पत्नी सुगंधासोबत आपला घटस्फोट झाल्याचं इन्स्टाग्रामवर जाहीर केलंय. पण त्याचा हे जाहीर करण्याचा अंदाज मात्र हटके आहे.
२९ जानेवारी कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळं झालेल्या या जोडप्यानं आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. आपल्या पोस्टमध्ये फोटोसोबत रघुनं लिहिलंय, 'काही गोष्टी कधीही बदलत नाही... जसं तुझ्यासाठी माझं प्रेम, जसं आपण एकमेकांसोबत करत असलेली मस्ती. काहीही संपणार नाही. हे केवळ बदलेल आणि एक नवा अध्याय सुरू होईल' यासोबत रघुनं #FriendshipGoals #DivorceGoals हे हॅशटॅग वापरलेत.
रघु रोडीजसोबत काही शॉर्ट फिल्म्स आणि सिनेमांतही दिसलाय. सध्या तो टीव्ही कार्यक्रम 'एन्टरटेन्मेंट की रात'मध्येही दिसतोय. तर सुगंधा गर्फ यापूर्वी 'जाने तू या जाने ना' या सिनेामात दिसलीय.
रघु आणि सुगंधानं २००६ मध्ये लग्न केलं होतं. २०१६ साली या जोडप्यानं एकमेकांपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती.