'शूटच्या आधी घ्यावी लागाली गर्भनिरोधक गोळी', बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदनचं धक्कादायक वक्तव्य...

'पटाखा', 'शद्दत' आणि 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी राधिका मदन खूपच बिंधास्त आहे.

Updated: Aug 21, 2022, 08:16 PM IST
'शूटच्या आधी घ्यावी लागाली गर्भनिरोधक गोळी', बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदनचं धक्कादायक वक्तव्य... title=

मुंबई : 'पटाखा', 'शद्दत' आणि 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी राधिका मदन खूपच बिंधास्त आहे. टीव्हीवरून करिअरची सुरुवात करणारी राधिका आज बॉलिवूडमध्ये सतत हिट चित्रपट देत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, राधिकाला तिच्या करिअरच्या पहिल्याच दिवशी शूटिंगमध्ये असं काही करावं लागलं होतं की, ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

गर्भनिरोधक गोळ्या विकत घेतल्या
राधिका मदनने 'शिद्दत' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीला तिला खूप संघर्ष करावा लागला. 'हे जाणून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे की, राधिका मदानला तिच्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीच्या शूटिंगदरम्यान गर्भनिरोधक गोळी घ्यावी लागली होती. राधिका मदनने एकदा याबद्दल सांगितले होतं, ''मला पहिल्या शूटसाठी गर्भनिरोधक गोळी घेण्यास सांगितलं होतं. जेव्हा दिग्दर्शकाने तिला गर्भनिरोधक गोळी खरेदी करण्यास सांगितलं तेव्हा तिला थोडं आश्चर्य वाटलं. कारण तो माझा पहिला शॉट होता.  

अशी  दिली पालकांनी प्रतिक्रिया 
राधिका मदनने पुढे सांगितलं की, यावेळी माझे पालक मला सरप्राईज देण्यासाठी माझ्या घरी पोहोचले होते. त्यांना पाहून मला आनंद झाला. पण जेव्हा त्यांनी त्या गोळ्या घरात पाहिल्या तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. राधिकाने सांगितलं की, तिच्या वडिलांनी त्या गोळ्यांकडे आश्चर्याने पाहिलं पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही.

इरफानच्या शेवटच्या चित्रपटाला ओळख मिळाली
तसं, राधिका मदनला 'पटाखा' आणि 'मर्द को दर्द नहीं होता' चित्रपटातून ओळख मिळाली. पण राधिकाने इरफान खानच्या शेवटच्या चित्रपट 'हिंदी मीडियम'मध्ये त्याची ऑन-स्क्रीन मुलगी बनून लोकांची मने जिंकली.