'राधे' चित्रपटाचं नवं गाणं 'झूम झूम'; सलमान-दिशाची भन्नाट केमिस्ट्री

'राधे' चित्रपटाचं तिसरं गाणं प्रदर्शित कण्यात आलं आहे.

Updated: May 10, 2021, 06:45 PM IST
'राधे' चित्रपटाचं नवं गाणं 'झूम झूम'; सलमान-दिशाची भन्नाट केमिस्ट्री title=

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत राधे योर मोस्ट वॉन्टेड(Radhe Your Most Wanted Bhai) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने यंद्याच्या वर्षी देखील त्याच्या चाहत्यांसाठी राधे चित्रपटाच्या रूपात ईदी आणली आहे. सर्वच जण सलमानच्या आगामी  चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. नुकताच चित्रपटाचं तिसरं गाणं प्रदर्शित कण्यात आलं आहे. 'झूम झूम' असं गाण्याचं नाव आहे. 

गाण्यात सलमान-दिशाची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.  हे गाणं प्रदर्शित होताचं तुफान व्हायरल होत आहे. 

'राधे' शिवाय सलमान खाननं 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. या सिनेमात भाईजान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत ऑनस्क्रीनवर रोमान्स करताना दिसणार आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचं वेळापत्रकही पूर्ण केलं आहे.