R. Madhavan च्या मुलाचा देशाला अभिमान... सर्वत्र लेकाच्या कामगिरीची चर्चा

R. Madhavan च्या मुलाबद्दल सांगावं तेवढं कमीचं... रचतोय विक्रमावर विक्रम  

Updated: Apr 17, 2022, 09:09 PM IST
R. Madhavan च्या मुलाचा देशाला अभिमान... सर्वत्र लेकाच्या कामगिरीची चर्चा  title=

मुंबई :  भारतीय जलतरणपटू साजन प्रकाशने डेन्मार्कमधील कोपनहॅगन येथे झालेल्या डॅनिश ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून सत्राची यशस्वी सुरूवात केली. तर दुसरीकडे अभिनेता आर. माधवनच्या मुलाने देखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं नाव मोठं केलं आहे. आर. माधवनचा मुलगा वेदांतने फ्री स्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. सध्या सर्वत्र या दोन खेळाडूंचं कौतुक होत. 

साजन आणि वेदांतच्या पालकांनाचं नाही, तर भारताला दोघांचा अभिमान आहे. मुलायाच्या यशानंतर आर. माधवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. सध्या आर. माधवनचं ट्विट सर्वत्र व्हायरल होत आहे. 

आर. माधवन ट्विट करत म्हणाला, 'दोघांना शुभेच्छा... साजन आणि वेदांतने भारतासाठी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले आहे..' असं म्हणत अभिनेत्याने कोच प्रदिप सर यांचे आभार देखील मानले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जलतरणपटू आणि 2 वेळचा ऑलिंपियन साजन प्रकाशने 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1:59:27 अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. अभिनेता आर माधवन याचा मुलगा वेदांत माधवन याने 1500m फ्री स्टाइल स्विमिंग प्रकारात रौप्य पदक कमावले आहे. त्याने 15:57:86 अशी वेळ नोंदवत कामगिरी केली आहे.