Pushpa फेम Rashmika Mandanna कडून अखेर प्रेमाची कबुली, म्हणाली...हा माझा हिरो

रश्मिकाने लाईव्ह सत्रादरम्यान तिच्या चाहत्यांना प्रतिसाद दिला. 

Updated: Jan 27, 2022, 01:29 PM IST
 Pushpa फेम Rashmika Mandanna कडून अखेर प्रेमाची कबुली, म्हणाली...हा माझा हिरो title=

मुंबई : मोठ्या पडद्यावर नृत्य, अभिनय आणि दमदार अ‍ॅक्शनने सर्वांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या सगळ्यांच्याच मनावर राज्य करत आहे. पण तुम्ही तिला बॅट धरून क्रिकेटच्या मैदानात षटकार मारताना पाहिलं आहे का? जर पाहिलं नसेल तर, विजय देवरकोंडासोबत एका चित्रपटात तिने क्रिकेटमध्येही हात आजमावल्याचे दिसून आले आहे.

डिअर कॉम्रेड या सिनेमात तिने महिला क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये रश्मिका मंदानाने चौकार आणि षटकार मारून गोलंदाजांची तारांबळ उडवली. 

यामध्ये रश्मिका हातात बॅट धरून गोलंदाजाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारताना दिसत आहे. यानंतर, तिने एक चौकार मारला, त्यानंतर दोन धावा काढल्या आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा खरं तर साऊथच्या चित्रपटाचा सीन आहे, पण नॅशनल क्रशने या चित्रपटासाठी भरपूर क्रिकेटचा सराव केला.

गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाइव्हमध्ये रश्मिका मंदान्नाने तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती. दरम्यान, त्यांचा आवडता क्रिकेटर कोण असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाच्या उत्तरात तिने विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांचे नाव घेतले नाही, त्याऐवजी, तिने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपला आवडता क्रिकेटर असल्याचं सांगितलं.

रश्मिकाने लाईव्ह सत्रादरम्यान तिच्या चाहत्यांना प्रतिसाद दिला. ती म्हणाला, 'ती धोनीच्या विकेटकीपिंग, फलंदाजी, कर्णधारपदाची मोठी चाहती आहे. तो मास्टर क्लासचा खेळाडू आहे. धोनी माझा हिरो आहे.