पंजाबी अभिनेत्याचा भयंकर अपघातात मृत्यू, गाडीचा चक्काचूर

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा मंगळवारी संध्याकाळी रस्ता अपघातात मृत्यू झाला.

Updated: Feb 15, 2022, 11:35 PM IST
पंजाबी अभिनेत्याचा भयंकर अपघातात मृत्यू, गाडीचा चक्काचूर title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन 2021 रोजी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याचा दिल्ली सीमेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झालाय.

हा अपघात झाला तेव्हा तो अमेरिकेतील त्याच्या मित्रासह खासगी वाहनातून जात होता. त्यांचा मृतदेह हरियाणातील सोनीपत येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.